Beed Crime :उपमुख्यमंत्र्याच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला, नेमकं प्रकरण काय?

बीड:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विलास मस्के असे जखमी समन्वयकाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाला आहे. त्यामुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत, कारवाईला सुरुवात केली आहे.


या मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे मारहाण करण्यात आली, याबाबत अद्याप काहीच कळू शकलेले नाही. सध्या विलास मस्के यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


विलास मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीड मधील वैद्यकीय मदत कक्षात गेल्या तीन वर्षांपासून काम पाहत आहेत. दरम्यान हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी विलास मस्के यांच्या नातेवाईकांनी केली आहे.



धारधार शस्त्राने केला वार


हाती आलेल्या माहितीनुसार, बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात टोळक्यांनी घराचा दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढले आणि धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार केले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.