मुंबईतील इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

मुबई: मुंबईत पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गिरगाव येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ही खळबळ उडाली. हा ईमेल थेट मंदिराच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवण्यात आला, त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना आणि बॉम्ब पथकाला याची माहिती दिली.


माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण मंदिर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (BDDS) देखील शोध मोहीम राबवली. मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.


दरम्यान, ईमेलची चौकशी करताना सदर मेलमध्ये धमकीचे शब्द वापरले गेले असल्याची सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संभाव्य अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात सुरक्षा अधिक तैनात करण्यात आली आहे.



सुरक्षेत वाढ


गिरगाव येथील इस्कॉन मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत, धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली. या प्रकरणाचा तपास गांवदेवी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आणि सायबर सेलच्या मदतीने मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस सुगावा लागला नाही, परंतु मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.


या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि

BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील नागरिकांना दर्जेदार,

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Driving Licence Rules : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे कडक नियम लागू!

- ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? हे नवीन नियम नक्की पाहा! मुंबई : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात ड्रायव्हिंग

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य