Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर


आशिया बूक रेकॉर्ड आणि इंडिया बूक रेर्काडमध्ये झाली नोंद


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन २२ जुलै २०२६ रोजी मुंबईत २९८ ठिकाणी करण्यात आले. भाजपच्या सर्व नगरसेवकांसह इतर प्रभागांमध्येही नगरसेवकांच्या माध्यमातून राबवलेल्या या लाडकी बहिण मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याच्या या अंतर्गत घेतलेल्या या शिबिरात तब्बल २७ हजार ८६६ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. आणि एकाच दिवशी एवढ्या मोठ्याप्रमाणात तपासणी केल्यामुळे याची नोंद इंडिया बूक रेकॉर्ड तसेच आशिया बूक रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस २२ जुलै रोजी साजरा करण्यात आला आहे. या वाढदिवसानिमित्त मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये लाडकी बहिणींच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील २२७ प्रभागांमध्ये तब्बल २९८ ठिकाणी लाडकी बहिण मुख्यमंत्र्यांची, घेवू काळजी तिच्या आरोग्याची या बॅनरखाली हा शिबिर राबवण्यात आला आहे. यामध्ये २७ हजार ८६६ महिलांची स्तनाच्या कर्करोगासंदर्भात तपासणी करण्यात आल्याचे महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी उपमहापौर संजय घाडी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महापालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे, श्री सिध्दीविनायक न्यासाचे खजिनदार पवनकुमार त्रिपाटी, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोषी, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते. भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे इतर कर्करोगांच्या तुलनेत एक चतुर्थांश पेक्षा अधिक आहे. त्यामुळे स्तन कर्करोगाचे लवकर निदान व्हावे, या दृष्टीने व्यापक तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात एकाच दिवशी एवढ्या मोठ्याप्रमाणात तपासणी करण्यात आली असून याची दखल आशिया बूक रेकॉर्ड तसेच इंडिया बूक रेकॉर्डने घेतली आहे. या संस्थेच्यावतीने महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी स्वीकारले.



कर्करोग तपासणी अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी २ डॉक्टर, २ परिचारिका, २ आरोग्यसेविका यांचा चमू कार्यरत होता. सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी या २९८ ठिकाणी हे शिबिराचे योग्य नियोजन करून डॉक्टर व इतर कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडली. याबाबत बोलतांना सर्व नगरसेवक, पक्षाचे महापालिकेतील नेते, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि यासर्वांच्या अथक प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होवू शकला असे सांगितले. ज्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत होईल, अशा महिलांच्या आरोग्याचा नियमित पाठपुरावा करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार व उपचारासाठी आवश्यक ती मदत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे लोकार्पण


दरम्यान, महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून आता महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्षाची दर्जोनत्ती करण्यात येत असून या कक्षाचे लोकार्पण महापौर रितू तावडे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महापौर वैद्यकीय निधीमध्ये आता अधिकाधिक वाढ करण्यात येणार असून महापौर वैद्यकीय निधीसाठी अर्ज करणाऱ्या रुग्णांना अधिक निधीची आवश्यकता असल्यास याठिकाणाहून त्यांचे अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला वर्ग केले जातील. त्यामुळे महापौर वैद्यकीय सहायता निधी गरीब आणि गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिला जाणारच आहे. पण त्याव्यतिरिक्त त्या संबंधित रुग्णाला या कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडूनही वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठीची सर्व प्रक्रिया या कक्षाच्यावतीने केली जाईल असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले

Comments

सुनिता शेश्वरे    July 24, 2026 03:50 AM

लाडक्या बहिणीचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला

Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक