BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा



मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील नागरिकांना दर्जेदार, परवडणारी, सर्वसमावेशक आणि उत्तरदायी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध स्तरीय व्यापक धोरण तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय बाबींशी संबंधित खात्यांना दिले आहेत. हे धोरण तयार करताना ते टप्पेनिहाय पद्धतीने तयार करावे आणि त्यामध्ये कृत्रिम बृद्धिमत्ता (ए. आय) आधारित कार्यवाही, स्वच्छता, मनुष्यबळ व्यवस्थापन यासारख्या विविध बाबींचा धोरणात समावेश करावा, असेही निर्देश महापालिका आयुक्त भिडे यांनी दिले आहेत. (BMC News)


मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय खात्यांची एक विशेष बैठक नुकतीच मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना भिडे बोलत होत्या. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा आणि संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. (BMC News)




मुंबई महानगरपालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य आणि वैद्यकीय सेवा सुविधा या अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने विविध स्तरीय सुधारणा टप्पेनिहाय पद्धतीने करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आरोग्य व वैद्यकीय खात्यांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित खात्यांद्वारे प्रस्तावित आराखड्याबाबत संगणकीय सादरीकरण‌ करण्यात आले. या आराखड्यामध्ये टप्पे व उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली असून त्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने धोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रस्तावित आराखड्यातील टप्पे व प्रत्येक टप्प्यात निर्धारित करण्यात आलेली उद्दिष्टे याविषयीचा तपशील पुढील प्रमाणे :-



पहिला टप्पा :


या प्रस्तावित आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय सेवा सुविधांच्या ठिकाणी नागरिकांची सनद प्रदर्शित करणे, रुग्णालय व दवाखान्यांमधील स्वच्छता व्यवस्थापन अधिकाधिक सक्षम व प्रभावी करणे, तक्रारींचे अधिक जलद गतीने निराकरण करणे, एच.एम.आय.एस. या संगणकीय प्रणालीची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे, रुग्णालयातील सेवा सुविधांबाबत सर्वसमावेशक डॅशबोर्ड कार्यान्वित करणे, 'स्मार्ट व डिजिटल ओपीडी' कार्यान्वित करून बाह्य रुग्ण कक्षात रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमीत कमी करणे अशी उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहेत. (BMC News)


तसेच सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येणाऱ्या विविध अनुज्ञप्ती, परवाने (लायसन्स) इत्यादींची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबविणे; ज्या नियम व अटींच्या आधारावर सदर अनुज्ञप्ती - परवाने देण्यात आले आहेत, त्या नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खातरजमा वेळोवेळी करणे; यासाठी आवश्यक तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे; इत्यादी बाबींचाही यात समावेश आहे. (BMC News)

त्याचबरोबर मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने वैद्यकीय रिक्त जागांवर भरती करणे, रुग्णांना आरोग्य विम्याचा लाभ मिळावा यासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये समर्पित विमा मदत कक्ष सुरू करणे, यासारख्या रुग्णांना अतिशय महत्त्वाच्या व सकारात्मक ठरतील अशा तंत्रज्ञान स्नेही बाबींचाही पहिल्या टप्प्यातील सुधारणांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आणीबाणीच्या प्रसंगी आवश्यक ती औषधे तात्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी देखील विशेष सुधारणा कार्यक्रमाचा समावेश या आराखड्यामध्ये करण्यात आला आहे. (BMC News)



दुसरा टप्पा :


या आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात निर्धारित करण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्ये प्रायोगिक स्तरावर 'ऑनलाइन बेड अलोकेशन' अर्थात ऑनलाईन पद्धतीने रुग्णालयातील खाटा प्रतिक्षा यादीवरील गरजू रूग्णांना उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील सेवांचे विकेंद्रीकरण करणे व यामध्ये प्रामुख्याने किरकोळ स्वरूपाच्या उपचारांसाठी रुग्णांना उपनगरीय रुग्णालयांकडे संदर्भित करणे, महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात आठवड्याचे सातही दिवस व २४ तास सुरू राहणारा दवाखाना प्रायोगिक स्तरावर सुरू करणे या बाबींचा समावेश आहे. (BMC News)


त्याचबरोबर गरजू रुग्णांना सार्वजनिक आणि खासगी सहकार्याने ५० टक्क्यांपर्यंत निधी उपलब्ध होण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न करणे, रुग्णालयात सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्तणूक कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स), वैद्यकीय नीतीशास्त्र आणि संबंधित बाबींचे प्रशिक्षण देणे; तर उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष पुरस्कार देणे यासारख्या बाबींचाही समावेश आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. (BMC News)


या प्रस्तावित आराखड्यातील दुसऱ्या टप्प्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता' अर्थात 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' यावर आधारित विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 'रेडिओलॉजी' व 'पॅथॉलॉजी' संबंधित बाबींचा आणि संसाधन व्यवस्थापन विषयक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.



तिसरा टप्पा :


या आराखड्याच्या तिसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने 'गुणवत्ता निर्धारण' यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये एन. ए. बी. एच. ऍक्रेडिटेशन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणीकरण, सर्वसमावेशक आणि 'डिजिटल' तंत्रज्ञान आधारित बाबींचा समावेश करण्यात आला आहे.


उत्कृष्टता व गुणवत्ता मानके या अंतिम टप्प्यात पात्र रुग्णांना विमा संरक्षण, अत्यावश्यक औषध उपलब्धता, आवश्यक पदे लवकरात-लवकर भरणे, दिव्यांगस्नेही आरोग्य सुविधा, सर्व महापालिका रुग्णालयांमधील खाटांचे अधिक प्रभावी व्यवस्थापन, सर्व कर्मचाऱ्यांना नैतिकता व सहानुभूती प्रशिक्षण, तसेच डॅशबोर्ड आणि हेल्थ कमांड सेंटर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (BMC News)


या आराखड्यामुळे मुंबईची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक कार्यक्षम, अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि अधिकाधिक नागरिकाभिमुख होण्यास चालना मिळणार आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या आराखड्याच्या माध्यमातून आपल्या मुंबईला देशातील आदर्श शहरी आरोग्य व्यवस्थेचा मान मिळवून देण्याचा संकल्प.


Comments
Add Comment

Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Driving Licence Rules : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे कडक नियम लागू!

- ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? हे नवीन नियम नक्की पाहा! मुंबई : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात ड्रायव्हिंग

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ४४ हजार कोटींच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ची अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार मुंबई(Mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस