मुंबईतील इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

मुबई: मुंबईत पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गिरगाव येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ही खळबळ उडाली. हा ईमेल थेट मंदिराच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवण्यात आला, त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना आणि बॉम्ब पथकाला याची माहिती दिली.


माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण मंदिर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (BDDS) देखील शोध मोहीम राबवली. मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.


दरम्यान, ईमेलची चौकशी करताना सदर मेलमध्ये धमकीचे शब्द वापरले गेले असल्याची सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संभाव्य अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात सुरक्षा अधिक तैनात करण्यात आली आहे.



सुरक्षेत वाढ


गिरगाव येथील इस्कॉन मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत, धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली. या प्रकरणाचा तपास गांवदेवी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आणि सायबर सेलच्या मदतीने मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस सुगावा लागला नाही, परंतु मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.


या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणार ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालय २० ते २५ मिनिटे अंधारात

शॉर्टसर्कीटमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित कोट्यवधीचा अर्थसंकल्प, पण महापालिका मुख्यालयात लिफ्टच्या

वांद्रे आणि खार पश्चिम भागात रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल

अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरा!

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद