बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जालना: राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यातील परतुर तालुक्यातील खांडवीवाडी शिवारात बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुरज कदम असं मयत मुलाचे नाव आहे.

बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी सुरज आपल्या काकासोबत गावाजवळ असणाऱ्या खदानीवर गेला होता. त्यांच्यासोबत गावातील अनेकजण बैल धुण्यासाठी आले आले होते. मात्र सगळे बैल धुण्यात मग्न असताना, सूरजचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत ५४ सामंजस्य करार  करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मितीत

बीएमसी शाळा खासगीकरण वादाने अधिवेशन तापले; अस्लम शेख–लोढा आमनेसामने

नागपूर : मालवणीतील बीएमसी टाऊनशिप शाळेच्या मुद्द्यावरून मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

छोटी राज्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात! - वेगळ्या विदर्भाबाबतच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि