१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती
२. दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥
३. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
४. येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप, हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०१॥
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि...
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०२॥
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०३॥
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें...
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०४॥
५. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥
राई-रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥
अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥