Tuljabhawani Darshan : २१ दिवसांची प्रतिक्षा अखेर संपली, आजपासून तुळजाभवानीचे दर्शन थेट चोपदार दरवाजातून सुरू

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे मागील २० दिवसांपासून धर्मदर्शन व देणगीदर्शन बंद ठेवण्यात आले होते. या काळात भाविकांना केवळ सामान्य दर्शनाचीच परवानगी होती. मात्र आता मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २१ ऑगस्टपासून धर्मदर्शन आणि देणगीदर्शन पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना अधिक जवळून आणि कमी वेळेत मूर्तीदर्शन करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध होणार आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने राज्यभरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे सध्या मंदिराच्या गाभाऱ्यातील व सिंहगाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. हे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू असून, १ ऑगस्टपासून दुरुस्तीची पहिली टप्पा प्रक्रिया हाती घेण्यात आली. या कालावधीत म्हणजे १ ते १० ऑगस्ट दरम्यान मंदिरातील धर्मदर्शन व देणगीदर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मात्र अपेक्षित वेळेत काम पूर्ण न झाल्याने मंदिर प्रशासनाने अजून दहा दिवसांसाठी दर्शनबंदी वाढवली होती. त्यामुळे या काळात भाविकांना केवळ सामान्य दर्शनाचीच परवानगी देण्यात आली होती.



चोपदार दरवाजातून कमी वेळेत दर्शनाची सोय


श्री तुळजाभवानी मंदिरातील धर्मदर्शन व पेड दर्शन पुन्हा सुरू होणार असल्याने भाविकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. गाभाऱ्यातील आवश्यक जीर्णोद्धाराची कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने मंदिर संस्थानला दिल्यानंतर, २१ ऑगस्टपासून दर्शनाची विशेष सुविधा पुन्हा उपलब्ध होणार आहे. यामुळे भाविकांना आता चोपदार दरवाजापासून कमी वेळेत आणि जवळून दर्शन घेण्याची सोय होणार आहे. मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे हजारो भाविकांची गैरसोय दूर होऊन त्यांना समाधान मिळणार आहे.

Comments
Add Comment

Job News : नोकरी शोधताय तर ही आहे तुमच्यासाठी बातमी

एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागामध्ये

आता ओबीसींचा महामोर्चा मुंबईकडे, दसऱ्यानंतर रंगणार निर्णायक लढा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं बेमुदत

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी

सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

पक्षाला यश मिळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या

बीडमध्ये रस्ते अपघातात नातीसह सरपंचाचा दुर्देवी मृत्यू

बीड: बीडच्या परळी तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात एका सरपंचाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परळी

समृद्धी महामार्गावर खिळे नाही, तर ॲल्युमिनिअम नोजल्स! बेशिस्त कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही