रत्नागिरीत भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, एक गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हा अपघात १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत वसंत धोत्रे (वय ४५, रा. नातुनगर, खेड) हे आपल्या कामावरून परत येत होते. खवटी नाक्यावरील राम पवार यांच्या सलूनमध्ये दाढी करून ते घरी जाण्यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने त्यांना धडक दिली.


या धडकेत धोत्रे यांच्या डाव्या हाताच्या बाहूला आणि उजव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .