मुंबई : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीत काय काय झालं? राज ठाकरेंनी सर्व सांगितलं

  62

राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. 45 मिनिटं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन मुंबईमधील सर्व समस्यांचा पाढा वाचला. राज ठाकरे आणि मुखयमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्यात 45 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राज ठाकरेंनी वाहतूक, पार्किंगबाबत फडणवीसांना आराखडा दिला. तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईमध्ये अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे.


रस्ते बनवणं हा धंदा आहे. टेंडर काढायची, रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत. खराब झाले की लगेच खड्डे बुजवायचं टेंडर काढायची. परत रस्ता बांधण्यासाठी टेंडर काढलं जातं. हे अनेकवर्ष सुरू आहे. याला लोक त्रासलेली आहेत. पण जे करतात त्यांनाच परत निवडून दिलं जात आहे. यांना खड्डात घातलं तरी लोक मतदान करणार आहेत, तर रस्ते चांगले मिळणारच नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


नुसत्या इमारती उंच बांधल्या जात आहेत. पण खाली जागा काय? वाहनं नियंत्रित करणं गरजेचं आहे, बाहेरुन येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत असंही राज ठाकरे म्हटले.


रोज या शहरांवर माणसं येऊन आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही, केवळ इमारती वर उंच हो आहेत. ही येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत, बाहेरच्या राज्यातील, बाहेरची शहरं विकसित करणं गरजेचं आहे. बाहेरची माणसं येणं थांबवली हवीत. जेवढं शक्य आहे करणं गरजेचं आहे. कायद्याला न जुमानणं वाढलं आहे, शिस्त लागलीच पाहिजे वाहतूककोंडी प्रचंड वाढली आहे. वाहतुकीबाबत शिस्त लागतीच पाहिजेच, मुंबईत बेशिस्तपणा, कायद्याला न जुमानणं वाढत चाललं आहे. हाताबाहेर गेलं तर कोणीच काही करू शकत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


400 मीमी पाऊस पडला, राज्य सरकारने ह्यावर काम केलं नाही. कबुतर , हत्ती या विषयांमध्ये आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टींवर लक्षच राहिलं नाही. लोकांना पार्किंगबाबत शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातील लोकांना काहीच माहिती नाही, या शहरात कशी पार्किंग केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी एक आराखडा दिलाय, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. काही उपाययोजना कराव्या लागतात.


पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी काही रंग असले पाहिजेत, असं राज ठाकरेंनी सांगितले.


Comments
Add Comment

कल्याण-डोंबिवली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

मुंबई : कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ

रायगड : पेणमधून यंदा दुप्पट गणेशमूर्ती परदेशात रवाना

रायगड जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती

पुण्यात सिंहगडावर पर्यटनाला आलेला युवक अद्याप बेपत्ता! नेमकं काय झालं?

पुणे : सध्या पावसाळी पर्यटनाला चेव फुटला असून, अनेक पर्यटनप्रेमी गड किल्ल्यांवर तसेच निसर्सरम्य ठिकाणी जात आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच होणार सुरु, सिडको अधिकाऱ्यांची मोठी माहिती

बहुचर्चित नवी मुंबईत तयार होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे. या विमानतळावरून सुरुवातीला

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट

मुंबई: राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि

राज्यात आजपासून काही भागात पावसाचा जोर ओसरणार

काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज गुरुवारी काही भागात