Pune News : लोणावळ्यात तरुणींची रस्त्यावर 'फ्री-स्टाईल' कुस्ती! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लोणावळा : सहसा निसर्गसौंदर्य, धबधबे आणि हिरवाईसाठी ओळखली जाणारी पर्यटननगरी लोणावळा रविवारी अक्षरशः रिंगणात बदलली. दारूच्या नशेत काही पर्यटक तरुणींची रस्त्यावरच धुमशान माजवतानाचा थरारक प्रकार समोर आला. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ए-१ चिक्की दुकानाजवळ या तरुणी थेट रस्त्यावर उतरल्या आणि एकमेकींवर तुटून पडल्या. केस ओढणे, चापटा-बुक्क्यांचा वर्षाव, अक्षरशः फ्री-स्टाईल कुस्ती पाहायला मिळाली. हा तमाशा पाहण्यासाठी क्षणातच प्रचंड गर्दी जमली. जमलेल्या लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद केला. काही मिनिटांतच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान, या हाणामारीमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि पर्यटकांना अडचणीतून प्रवास करावा लागला. लोणावळ्याच्या शांत वातावरणाला धक्का बसला असून, पर्यटक तरुणींच्या या बेताल वागण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.





नेमकं काय घडलं?


रविवारच्या दुपारी पर्यटननगरी लोणावळा अक्षरशः रणांगणासारखी दिसत होती. परिसरात गाड्यांचे कर्कश हॉर्न, तरुणींचा आरडाओरडा आणि जमलेल्या गर्दीचे जल्लोषी आरोळ्या यामुळे वातावरण गोंधळून गेले होते. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ए-१ चिक्की दुकानाजवळ नशेत असलेल्या काही पर्यटक तरुणींनी रस्त्यावरच हाणामारीला सुरुवात केली. दोघींचे एकमेकींचे केस धरून ओढणे, चापटाबुक्क्यांचा वर्षाव आणि अश्लील शिवीगाळ यामुळे उपस्थितांना धक्का बसला. गोंधळ वाढत चालल्याने लोणावळा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या बेताल तरुणी थांबत नव्हत्या. उलट त्यांचा वाद थेट पोलिस चौकीपर्यंत पोहोचला. शेवटी महिला पोलिसांनी मध्यस्थी करत सर्व तरुणींना ताब्यात घेतलं. सध्या लोणावळा पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. नेमकं कोणत्या कारणावरून एवढा रगेल प्रकार घडला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, पर्यटक आणि स्थानिकांमध्ये यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

सहा किलोमीटरची जीवघेणी पायपीट, बाळाचा पोटातच मृत्यू, टाहो फोडत आईनंही जीव सोडला

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे एका नऊ महिन्यांच्या

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दोन मृत

भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

३१ बछड्यांचा समावेश नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या

राज्यात थंडी वाढणार! काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज

मुंबई: नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. १ जानेवारीला कोकणात

महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती!

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्ती आहे’,

बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची