भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही, तसेच पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची परवानगी दिली जाणार नाही अशी मोठी घोषणा करण्यात आली आहे. तसेच आशिया चषक आणि आयसीसी सारख्या अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांबद्दलची भूमिकाही केंद्र सरकारनं स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धा त्रयस्थ देशांत खेळवल्या जात असल्यास त्यात भारत सहभागी होऊ शकेल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे.


त्यामुळे येत्या आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. थोडक्यात काय तर, भारताने आपल्या धोरणात कोणताही बदल केलेला नाही. आशिया चषक स्पर्धेत अनेक देशांचा सहभाग असतो. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत उतरेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना केवळ आशिया चषक किंवा आयसीसी स्पर्धांमध्येच दिसेल, ही बाब स्पष्ट झाली आहे. पाकिस्तानचे संघ आणि खेळाडू सहभागी होत असलेल्या स्पर्धांमध्ये भारताचे संघ आणि खेळाडू सहभागी होतील. भारतात होणाऱ्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघ आणि खेळाडूंना सहभागी होण्यास परवानगी देण्यात येईल, अशी माहिती क्रीडा मंत्रालयातील अधिकाऱ्यानं दिली.



आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा


भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटले आहे. त्यासाठी कारण देताना क्रीडा मंत्रालयाने आशिया चषक ही स्पर्धा दोन देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये आहे, त्यामुळे या स्पर्धेतील भारत-पाक सामना रोखणं योग्य होणार नाही असे म्हटले आहे. जर केवळ दोनच देशांमध्ये क्रिकेट सामन्यांची स्पर्धा असती तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला विरोधच असता असंही केंद्राने म्हटलं आहे.


पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले. त्याशिवाय पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. मात्र आशिया चषक स्पर्धेत आशियातील अनेक देश सहभागी होत असल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि

Hardik Pandya Century : पांड्या इज बॅक! ६ चेंडूत ३४ धावा अन् करिअरमधील पहिलं वादळी शतक; पाहा धडाकेबाज शतकाचा Video

राजकोट : भारतीय क्रिकेट संघ आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी संघ