सोने चांदी महागली सामान्यांच्या आवाक्यबाहेर ! 'या' कारणामुळे

प्रतिनिधी: सोन्याच्या व चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरतेच्या फटक्यानंतर मागणीही वाढल्याने सोने चांदीचे दर उंचावले आहेत.तर दुसरीकडे फेडरल रिझर्व्ह सप्टेंबर महिन्यातील दर कपातीचे संकेत प्रश्नांकित ठरल्याने तसेच गुंतवणूकदां नी खबरदारी घेत कमोडिटीतील गुंतवणूक ' 'होल्ड' केल्यामुळे सोने चांदीतील दर वाढले. पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत वाढ स्पॉट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६० रुपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५० रुपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४१ रूपये वाढ झाली आहे. परिणामी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १००७५ रूपये, २२ कॅरेटसाठी ९२३० रूपये, १८ कॅरेटसाठी ७५५२ रुपयांवर पोहोचले आहेत.


संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ६०० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५०० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४१० रूपये वाढ झाली आहे.परिणामी प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १००७५० रू पये, २२ कॅरेटसाठी ९२३०० रूपये, १८ कॅरेटसाठी ७५५२० रूपये किंमत भारतीय सराफा बाजारात सुरू आहे.माहितीनुसार, भारतातील मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याचे दर पाहिल्यास २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर १००७५ रूपये, २२ कॅरेटसाठी ९ २३० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६३० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत मात्र ०.१८% घसरण झाली होती. मात्र सकाळी सुरुवातीला सोन्याच्या जागतिक निर्देशांकातही वाढ कायम होती. भारतीय कमोडिटी बाजा रातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याचा निर्देशांक ०.१२% घसरला असून सोन्याची दरपातळी ९९१८४ रूपये प्रति ग्रॅम आहे. जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.२५% घसरण झाली आहे.


आज जागतिक सोन्याच्या दरपातळीत वाढ झाली आहे. विशेषतः युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीच्या अनिश्चितेमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीने संयम बाळगला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ईटीएफसह प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूकीत पुरवठा मर्या दित राहिल्याने व सुरक्षित कमोडिटी बाजारातील गुंतवणूक म्हणून सोन्याच्या स्पॉट बेटिंग मागणीत वाढ झाल्याने सोने महागले आहे. खरं तर ऑगस्टपर्यंत सोन्याच्या एकूण निर्देशांकात व किंमतीतही ३% घसरण झाली होती. मात्र पुन्हा वाढ झाल्याने मार्जिनमध्येही वाढ झाली. आता आगामी काळातील विशेषतः गणपती उत्सव, दिवाळी सणाच्या निमित्ताने सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होऊ शकते. युएस बाजारातील आगामी महागाई, उत्पादन आकडेवारी महत्वाची अ सल्याने त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित आहे. रोजगार निर्मितीपेक्षा महागाईत वाढ झाल्याचे फेडने म्हटल्याने सोने आणखी महाग होणे अपेक्षितच होते.


चांदीतही वाढ -


चांदीतही वाढ कायम असून संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रुपये, व प्रति किलो दरात १००० रूपयांनी वाढ झाली आहे. परिणामी प्रति ग्रॅम दर ११६ रुपयांवर व प्रति किलो दर ११६००० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी दर ११६ रुपये, व प्रति किलो चांदी ११६००० रूपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या मागणीत सोन्याला पर्याय म्हणून वाढ होत अस्याने चांदीत वाढ झाली आहे. जागतिक चांदीच्या निर्देशांकातील सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.०८% वा ढ दुपारपर्यंत झाली होती. तर भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्समध्येही चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ०.०६% वाढ झाल्याने दरपातळी ११२६२६ रूपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Persistent System Share Surge: तिमाही निकालानंतर Persistent System कंपनीच्या शेअर्समध्ये ७% उसळी 'या' कारणांमुळे

मोहित सोमण:आज सकाळी परसिस्टंट सिस्टिम लिमिटेड कंपनीचा शेअर ७.१०% पातळीवर उसळला आहे. काल कंपनीने आपला तिमाही निकाल

TKM Sustainability Report: टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून सस्‍टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ सादर

मुंबई:टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (TKM)ने आपला सर्वसमावेशक सस्‍टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ (Inclusive Susitanable Report 2025) अहवालाची घोषणा

Stock Market Update: शेअर बाजारात वाढ ! सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' उसळला जागतिक वातावरण वाढीस पुरक

मोहित सोमण:जागतिक पातळीवरील काल संमिश्रित कामगिरीनंतर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात पुन्हा एकदा वाढ झाली

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना