पोलीस भरतीचा जीआर आला; महाराष्ट्रात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती!

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांच्या मेगाभरतीसाठी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरतीला मान्यता देण्यात आली होती आणि आता त्याचा अधिकृत जीआर प्रसिद्ध झाला आहे.




  • पोलीस शिपाई पदासाठी १२,३९९ जागा

  • पोलीस शिपाई चालक पदासाठी २३४ जागा

  • बॅंड्समनसाठी २५ जागा

  • सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी २,३९३ जागा

  • कारागृह शिपाईसाठी ५८० जागा 


या भरती प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत.



वयोमर्यादेत सूट: सन २०२२ आणि २०२३ मध्ये ज्या उमेदवारांनी संबंधित पदांची कमाल वयोमर्यादा ओलांडली होती, त्यांना एक विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.


परीक्षा पद्धत: ही भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवली जाईल आणि लेखी परीक्षा OMR आधारित पद्धतीने घेतली जाईल.


परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाईल.


पारदर्शकता: या भरती प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी आणि नियंत्रण पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे असेल, जेणेकरून भरती पारदर्शक आणि सुरळीत पार पडेल.


ही भरती प्रक्रिया १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त झालेली आणि रिक्त होणारी पदे भरण्यासाठी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत येण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा

Aniket Nikam : ‘भाषण विसरणाऱ्या अमित ठाकरेंनी आधी स्वतःचे कर्तृत्व पाहावे’; भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम

CM Devendra Fadnavis : गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मुंबई : महाराष्ट्राचा