मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अमित ठाकरे यांनी प्रथम स्वतःचे कर्तृत्व आणि राजकीय आवाका तपासावा, त्यानंतर भाजप नेत्यांवर टीका करावी, असा टोला मुंबई भाजपचे प्रवक्ते ॲड. अनिकेत निकम यांनी लगावला. (Aniket Nikam)
अमित ठाकरे यांनी अमित साटम यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्याचा आरोप करत निकम यांनी त्यावर आक्षेप घेतला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीने जनाधारातून निवडून आलेल्या आमदारावर टीका करणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. “अमित ठाकरे हे राजकारणात अद्याप नवखे आहेत. त्यामुळे त्यांनी कोणावर टीका करण्यापूर्वी स्वतःचा राजकीय अनुभव आणि कर्तृत्व तपासावे,” असे निकम म्हणाले.
आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.
आडनाव फक्तं ठाकरे आहे म्हणून नाही तर कर्तृत्व शून्य आहे अमीत ठाकरे तुमचं...
कशाला उगीच उंटाचा मुका घ्यायला जाता ?@amitrthackeray@AmeetSatam @BJP4Mumbai https://t.co/I1tFpTvb5j
— Aniket Nikam (@AdvAniketNikam) August 27, 2026
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मुंबई : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक ...
‘ठाकरे आडनावाव्यतिरिक्त स्वतःचे कर्तृत्व काय?’
अमित ठाकरे यांच्या राजकीय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत निकम यांनी, “ठाकरे हे आडनाव वगळता अमित ठाकरे यांचे स्वतःचे कर्तृत्व काय आहे, याचा त्यांनी विचार करावा,” अशी टीका केली. कोणत्याही विषयावर बेधडक विधाने करण्याची सवय आता अमित ठाकरेंनाही लागल्याचे दिसत असल्याचे निकम यांनी म्हटले. तसेच राजकारणातील आपला अनुभव आणि जनाधार लक्षात घेऊनच नेत्यांनी इतरांवर टीका करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. (Aniket Nikam)