बारावीच्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवले

भोपाळ: एकतर्फी प्रेमातून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या २६ वर्षीय शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी सूर्यांश कोचर हा बारावीत शिकतो, तर पीडित शिक्षिका स्मृती दीक्षित आहेत. दोघांची ओळख गेल्या दोन वर्षांपासून होती. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सूर्यांशने स्मृती यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्याची तक्रार स्मृती यांनी शाळा प्रशासनाकडे केली. या तक्रारीमुळे चिडून जाऊन सूडाच्या भावनेने सूर्यांशने हा हल्ला केला.


ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. आरोपी पेट्रोलची बाटली घेऊन शिक्षिकेच्या घरी गेला आणि तिच्यावर पेट्रोल शिंपडून तिला पेटवून दिले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. स्मृती यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या १० ते १५ टक्के भाजल्या असून, सुदैवाने त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.


पोलीस अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितले की, "एकतर्फी प्रेम आणि सूडाच्या भावनेतून सूर्यांशने थंड डोक्याने हा कट रचला होता." फरार झालेल्या सूर्यांशला पोलिसांनी डोंगरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपूर गावातून अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२४ सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव