अज्ञात दरोडेखोरांचा देवळालीत धाडसी दरोडा

स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडले


राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल भरवस्तीत असलेल्या असलेल्या स्टेट बॅंकेचे एटीएम गॅसकटरच्या साहाय्याने कापून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. देवळाली प्रवरा येथे पोलिस चौकी असूनही त्यांच्या नाकावर टिच्चून हा धाडसी दरोडा दरोडेखोरांनी घातल्याने परिसरात घबराट पसरली आहे. देवळाली प्रवरा परिसरात चोरीचे सत्र सुरू असून त्यात या मोठ्या घटनेची भर पडली आहे. येथील पोलिस चौकी कायमच बंद राहात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीची गस्तही अनेक वर्षा पासून बंद, देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसापासून घरफोड्या व चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना, तरी पोलिसांनी मात्र अद्यापही गस्त सुरु केलेली नसल्याने, पोलिस साखर झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एसीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून रोख रक्कम लंपास करुन दरोडा घातला आहे. एटीएमवर दरोडा घालण्याची घटना घडल्यानंतरही देवळाली प्रवराची चौकी बंदच होती. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत राहुरी फॅक्टरी सह देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, नुकतेच आठ दिवसापूर्वी येथील चार बंगले चोरट्यांनी फोडले. त्याचबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली. तर मागील दोन दिवसापूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान बुधवारी सकाळी देवळाली प्रवरा शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठी रक्कम लंपास केली आहे. किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकली नाही. देवळाली प्रवरात स्वतंत्र पोलिस चौकी आहे. परंतू पोलिस चौकीत नेमणूकीस असलेले पोलिस, पोलिस चौकी उघडण्यासही येत नाहीत. पोलिस स्वतःच्या घरी साखर झोपेत असताना एसबीआय बँकेचे एटीएमवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडा टाकणारे अज्ञात दरोडे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या बोलोरो गाडीतून आले होते. पोलिस त्या गाडीचा सीसीटिव्हीच्या माध्यमातून गाडीच्या क्रमांकाचा शोध घेत आहेत. ठसेतज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वंडागेकर, हे.काँ.शाहिन पठाण, पो.काँ. मुरलीधर खरपूडे, फॉरेन्सिकचे गणपत झरेकर, सोहेल सय्यद ठसे घेण्यासाठी आले असता, एसबीआय बँकेचे एटीएममध्ये पाचशे व शंभरच्या नोटा सापडल्या एटीएम मधील पैशाचे सर्वच बाँक्स दरोडेखोरांनी नेले आहेत. घटनेची माहिती समजतात राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, संदिप मुरकूटे, सूरज गायकवाड, गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे तसेच एलसीबीचे अतुल लोटके, रमिराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, महादेव भांड यांनी धाव घेत तांत्रिक तपास सुरू केला आहे. यासंदर्भात राहुरी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध