ऐन पावसात अ‍ॅप बेस्ड कॅब सेवांनी केली प्रवाशांची लूट


मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती. ठिकठिकाणी बेस्टच्या बस पाण्यात अडकल्या होत्या. या परिस्थितीत काही नागरिकांनी प्रवासाचा सुरक्षित पर्याय म्हणून अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण या गरजू प्रवाशांना कंपन्यांनी लुबाडल्याची बाब समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत हजारो रुपयांचे भाडे अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आकारले होते. कल्याण ते सीएसएमटी / चर्चगेटसाठी २,४०० रुपये आणि सीएसएमटी ते ठाणेसाठी १,५०० रुपयांची आकारण्याचे प्रकार घडले. यामुळे पावसाने त्रासलेल्या नागरिकांना सुरक्षित प्रवासाकरिता खिसा रिकामा करण्याची वेळ आली होती.


मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे अनेक वाहने अडकली होतो. अंधेरी, कुर्ला घाटकोपर रोड मरोळ नाका, बीपीटी रोडवरील कॉटन फाटक परिसरात दोन फूट पाणी साचले होते. पेडर रोड, महालक्ष्मी मंदिर आणि ताडदेव परीसरात दिड फूट पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतूक बंद होती. रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती त्यामुळे अनेकांनी लांबच्या प्रवासाकरिता अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण परिस्थितीचा गैरफायदा घेत कॅबवाल्याने थेट दिड ते अडीच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले.


एरव्ही बक्कळ नफा कमवणाऱ्या ॲप आधारित कॅब सेवांनी किमान नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ना नफा ना तोटा दरात सेवा द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. वाजवी दरापेक्षा अधिक पैसे आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर सरकारनेच नियमावली करुन कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली.


Comments
Add Comment

ठाण्यात आज ऑरेंज, तर उद्या यलो अलर्ट

जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या

वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार

मुंबई : वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार आहेत. जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून

कांजूरमार्ग ते बदलापूर प्रवास होणार जलद, सोपा

मेट्रो १४ असणार देशातील सर्वात लांब मेट्रो मार्ग मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बदलापूर

म्हाडा राज्यात साडेअकरा हजार घरे बांधणार

मुंबईत सर्वसामान्यांसाठी १ हजार ४७४ घरे मुंबई : म्हाडाकडून चालू आर्थिक वर्षांत सामान्यांसाठी किती घरे उपलब्ध

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार

प्रसिद्ध वेशभूषाकार दीपा मेहता यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिझायनर) आणि नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर