मोहित सोमण: काल ऑटो आज टेक्सटाईल शेअर तेजीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्धमान टेक्सटाईल, नहार स्पिनींग या समभागात सत्र सुरू होताच ९% रॅली झाली आहे. याशिवाय वेलस्पून, किटेक्स गारमेंट, इंडो रामा सिथेंटिक्स या शेअर्समध्ये ३% ते ३.५० % पर्यंत वाढ बाजार सुरु होताच झाली होती काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीएसटी आकारणीय कपात व जीएसटीत महत्वपूर्ण बदलाचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आज टेक्सटाईल शेअर्समध्ये मोठी रॅली झाली आहे. आगामी दरकपातीमुळे टेक्सटाईल वस्तूं वर अस्तित्वात असलेल्या दरकपातीचा फायदा होऊ शकतो तसेच सरकारने कच्च्या कॉटनवरील ११% ड्युटी हटवल्याने टेक्साटाईल शेअर्सबद्दल गुंतवणूकदारांच्या मनात आश्वासकतेचे उभारले गेल्याने आज शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
सकाळी ११.३० वाजता वर्धमान टेक्सटाईल शेअर ६.८१% वाढला असून किटेक्स गारमेंट (४.३८), नितीन स्पिनर (३.८२%),नहार स्पिनिंग (५.३३%), सियाराम सिल्क मिल्स (६.०६%) समभागात (Stocks) वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात,अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील आयातीवर २५ टक्के पर्यंत कर आणि रशियासोबत ऊर्जा आणि संरक्षण संबंध सुरू ठेवल्यास अतिरिक्त २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर कापड समभागांनी बाजाराला कमकुवत कामगिरी केली होती दरम्यान गेल्या ए का महिन्यात बीएसई सेन्सेक्स १ टक्क्यांनी घसरला होता.