मुंबई मोनोरेल बिघाड: क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे सेवा ठप्प, प्रवाशांचा जीव धोक्यात

मुंबई: मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांनी मोनोरेलकडे धाव घेतली, मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दीमुळे आज मोनोरेलची सेवाही ठप्प झाली. भक्ति पार्क ते चेंबूरदरम्यान धावणारी RST-4 ही मोनोरेल मैसूर कॉलनी स्टेशनजवळ अचानक थांबली, कारण तिच्या मूळ क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला.


प्राथमिक तपासणीनुसार, मोनोरेलची मूळ क्षमता १०४ टन असताना, आजच्या प्रचंड गर्दीमुळे तिचे वजन सुमारे १०९ मेट्रिक टन झाले होते. या अतिरिक्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टरमधील संपर्क तुटला आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळेच ही मोनोरेल जागेवर थांबली.


एमएमआरडीएने तातडीने तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी पाठवली आणि दुसऱ्या मोनोरेलने तिला खेचून स्टेशनपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरिक्त वजनामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य करावे लागले.



आज हार्बर लाईनवरील लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी मोनोरेल स्थानकांवर झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही गर्दी नियंत्रणात आली नाही, कारण प्रवाशांची संख्या खूप वाढली होती.


एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, मोनोरेलची रचना मर्यादित क्षमतेसाठी आहे आणि ती लोकल किंवा मेट्रोसारख्या मोठ्या गर्दीचे वहन करण्यासाठी तयार केलेली नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी सुरक्षा आणि तांत्रिक पथकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.


सध्या एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या समन्वयाने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची सखोल तांत्रिक तपासणी केली जात असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही एमएमआरडीएने सांगितले.

Comments
Add Comment

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी

मुंबईतील स्ट्रीट फर्निचरच्या कंत्राट कामांना बोनस, आणखी वाढवून दिली एवढ्या कोटींची रक्कम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या प्रशासकांच्या काळात मंजूर झालेल्या वादग्रस्त स्ट्रीट फर्निचरची कामे