महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २८ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती

मुंबई : महाराष्ट्र आता ‘डेटा सेंटर कॅपिटल’ आणि ‘सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल’ म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत गुंतवणूक करत असून, उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबतच्या धोरणात्मक करारामुळे गुंतवणुकीचे नवे दरवाजे उघडले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यात आज विविध क्षेत्रांत तब्बल ४२,८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे आठ सामंजस्य करार (MoUs) आणि दोन धोरणात्मक करार करण्यात आले आहेत. यातून २८ हजारांपेक्षा जास्त नवीन रोजगार निर्माण होतील.


आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १० सामंजस्य करारांचे आदान-प्रदान झाले. यावेळी मुख्य सचिव राजेशुमार, उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह तसेच विविध क्षेत्रातील कंपन्यांचे गुंतवणूकदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रावर दाखवलेला विश्वास प्रशंसनीय आहे. राज्यात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत काम करेल.” त्यांनी पुढे सांगितले की, हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळत असून, हा प्रकल्प लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात मोठे बदल घडवेल.



मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ८ सामंजस्य करार आणि ३ रणनीतिक करार करण्यात आले. या महत्त्वाच्या करारांनुसार, ज्यूपिटर इंटरनॅशनल लि. सोबत सौर पॅनेल निर्मितीसाठी १०,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून ८,३०८ रोजगार निर्माण होतील. डेटा सेंटरसाठी रोचक सिस्टिम्स प्रा.लि. आणि रोव्हिसन टेक हब प्रा.लि. यांच्यासोबत एकूण ५,०७२ कोटी रुपयांचे करार झाले आहेत. पोलाद उद्योगासाठी वॉव आयर्न ॲण्ड स्टिल प्रा.लि. सोबत ४,३०० कोटी, तर हरित ऊर्जा क्षेत्रात एलएनके ग्रीन एनर्जी सोबत ४,७०० कोटी रुपयांचा गुंतवणूक करार करण्यात आला आहे.


याव्यतिरिक्त, वेबमिंट डिजिटल प्रा.लि. सोबत डेटा सेंटरकरिता ४,८४६ कोटी, औद्योगिक उपकरणांसाठी ॲटलास्ट कॉपको सोबत ५७५ कोटी, आणि डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स व रिअल इस्टेट क्षेत्राकरिता प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि. सोबत १२,५०० कोटी रुपयांचा मोठा गुंतवणूक करार झाला आहे. या सर्व गुंतवणुका महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी गती देतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


याशिवाय, ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर तर्फे महाराष्ट्रातील युके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी सहकार्य करण्याचा सामंजस्य करार आणि टीयूटीआर हायपरलूम प्रा.लि. कंपनीकडून जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना

ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी नवीन नियमावलीची घोषणा !

मुंबई : महाराष्ट्रातील ॲपवर आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) शिस्तबद्धता, प्रवासी

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव