Narendra Modi : भारताचं दमदार प्रत्युत्तर! अमेरिका-चीनची चिंता वाढणार, टॅरिफनंतरही अर्थव्यवस्थेत दिलासादायक गुडन्यूज

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा पुढे करत अमेरिकेने आणखी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकूण ५० टक्के टॅरिफ भारतीय वस्तूंवर लागू होणार आहे. हा नवा टॅरिफ येत्या २८ ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या सर्व अंदाजांना धक्का देणारी आणि वेगळे चित्र दाखवणारी माहिती आता समोर आली आहे.

“भारताचा बेरोजगारी दर घसरला; जुलै महिन्यात ५.२% वर”


जुलै महिन्यात भारताच्या बेरोजगारी दरात लक्षणीय घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. देशाचा बेरोजगारी दर ५.६ टक्क्यांवरून कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागातील स्थिती पाहता, १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांचा बेरोजगारी दर ४.९ टक्क्यांवरून घसरून ४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. या घटेमागे मुख्य कारण म्हणून ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे शेतामध्ये सुरू असलेली कामे दिली जात आहेत. दरवर्षीप्रमाणेच पावसाळा आणि हिवाळ्यात शेतीसंबंधित कामांमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्राला गती मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


"शहरी बेरोजगारीत किंचित वाढ, तरीही देशाचा बेरोजगारी दर ५.२% वर”


भारतातील बेरोजगारीच्या आकडेवारीत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वेगवेगळे चित्र दिसून येत आहे. शहरी भागात बेरोजगारी दरात किंचित वाढ झाली आहे. जून महिन्यात शहरी बेरोजगारी दर ७.१ टक्के होता, तो जुलै महिन्यात वाढून ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींमुळे एकूण राष्ट्रीय बेरोजगारी दर घटला आहे. सरासरी पाहता, भारताचा बेरोजगारी दर ५.६ टक्क्यांवरून कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आला आहे. या घटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जीएसटी सुधारणा; रोजगारवाढीची शक्यता


भारतातील अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. केंद्र सरकारकडून नुकतंच जीएसटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा (GST Reform) करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या सुधारणा अमलात आल्यास देशातील व्यापाराला चालना मिळेल आणि विविध क्षेत्रांमध्ये नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, बेरोजगारी दर आणखी खाली येऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, जीएसटी रिफॉर्मच्या निर्णयामुळे या चिंतेवर काही प्रमाणात पाणी फिरल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात रोजगार वाढून बेरोजगारी दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

जलद डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर सरकारची भूमिका; क्विक कॉमर्स कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने

मासिक पाळीतील तीव्र वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू; महिलांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न

कर्नाटक : मासिक पाळीशी संबंधित वेदना अनेकदा हलक्याने घेतल्या जातात. मात्र अशा वेदना एखाद्या व्यक्तीसाठी प्रचंड

टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत

ब्रह्मपूर (ओडिशा):येथील तरुण फॅशन डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून एक अनोखी कलाकृती साकारत

काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक; एनआरआय महिलेच्या तक्रारीवरून तिसरं प्रकरण उघड

पथनमथिट्टा (केरळ) : काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि आमदार राहुल ममकुटाथिल यांना महिलेशी गैरसंबंधान बाबत गंभीर

ताजमहालचे तळघर उघडणार! ३ दिवस मोफत पाहण्याची संधी

उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती आग्रा: जगातील सातवे आश्चर्य मानल्या जाणाऱ्या

रायसीना हिल्सजवळ पंतप्रधान मोदींचे नवे कार्यालय

निवासस्थानही बदलणार नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रायसीना हिल्स परिसरातील नवे कार्यालय आता