काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देणार: मंत्री नितेश राणे

चंदगड: सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल, याकडे आपण लक्ष देऊ. तसेच काजूचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी आपण प्रयत्न करू, असे मत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी चंदगड येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या चंदगड येथील उपविभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी कार्यालयाच्या कामाची पाहणी करून काजू उत्पादन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.


 पालकमंत्री राणे म्हणाले, “कोकण आणि चंदगड यांच्या निसर्गामध्ये फारसा फरक नाही. काजू उत्पादन वाढले पाहिजे. कोकणचा काजू अतिशय चविष्ट आहे; मात्र बाहेरच्या भागातील काजू कोकणात आल्यावर त्याला स्पर्धा करावी लागते आणि तो दरात टिकत नाही. यावर उपाय शोधण्याची गरज आहे. डॉ. परशुराम पाटील यांनी यावर काम करावे. त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला उपयोग होईल. माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल ती मी पूर्ण करीन.”


या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ व गोवा-महाराष्ट्र नीती आयोग सदस्य डॉ. परशुराम पाटील, भाजप चंदगड तालुकाध्यक्ष दीपक पाटील, कृषी काजू प्रक्रिया उद्योग चंदगडचे अध्यक्ष नामदेव पाटील, मोहन परब, जयवंत शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काजू मंडळातर्फे मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. परशुराम पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारत हा काजू उद्योगात एकेकाळी अग्रगण्य देश होता. जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा ९४ टक्के इतका होता; मात्र सध्या तो घटून ३ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. हे उत्पादन वाढवणे अत्यावश्यक आहे.”

Comments
Add Comment

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे

महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर उद्या सुनावणी

बालगंधर्व रंगमंदिर सज्ज पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग

पुणे मेट्रोचे गणेशोत्सवात साडेपाच कोटींचे उत्पन्न

पुणे : मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत