मुलुंडकरांनो गुरुवारी पाणी जपून वापरा, १८ तास पाणीबाणी

मुंबई : मुलुंडमधील काही भागांत गुरुवार २१ ऑगस्ट रोजी १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. एक जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे टी वॉर्ड या मुलुंड वॉर्डमध्ये ‘मॅरेथॉन मॅक्सिमा’ इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार आहे. ही जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट २०२५ ला सकाळी १० वाजल्यापासून ते २२ ऑगस्टला पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागाचा पाणीपुरवठा अठरा तास बंद राहणार आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता आणि लगतचा परिसर, मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, जवाहरलाल नेहरू मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस.एन.मार्ग, आर.एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी.मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल.मार्ग, नाहुर गाव या भागात पाणीपुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी साठवून आणि जपून वापरावे तसेच नवीन पाइपलाइनमधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर किमान ५ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Comments
Add Comment

मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात! ओबीसी नेत्यांचे ठरले

न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांची तयारी मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

गोराई बीचवर भरतीच्या लाटेत बस गेली वाहून, प्रवाशांचं काय झालं पहा...

मुंबई: गोराई बीचवर सोमवारी एक थरारक घटना घडली. एक मिनीबस भरतीमुळे समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने घबराट

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब

MahaRERA : बाधित घर खरेदीदारांना दिलासा; ५,२६७ तक्रारी निकाली, भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी महारेराचे कठोर पाऊल

मुंबई: राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी मोहीम हाती

MRVC Vande Metro AC Local : मुंबईकरांनो आता गारेगार प्रवास करा! गर्दीतही आरामदायी अन् वेगवान, मुंबई लोकलमध्ये एसी डबे होणार लवकरच सुरू

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांना अधिक

E-Water Taxi : काय सांगता? गेटवे ते जेएनपीए फक्त ४० मिनिटांत! ई-वॉटर टॅक्सीची धमाकेदार एंट्री; 'या' तारखेपासून होणार सुरु

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सोयींनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी आता