इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना 'उरुण' चा समावेश करण्याबाबत जयंत पाटील यांचे राज्यपालांकडे निवेदन

सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठीही पाठविण्यात आला आहे. मात्र नामकरणाच्या या प्रस्तावात 'उरुण' हा शब्द वगळलेला आहे.  त्यामुळे इस्लामपूरच्या नव्या नावात उरूणचा देखील समावेश व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेतली. या दरम्यान त्यांनी राज्यपालांना निवेदनही दिले आहे.  जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती दिली आहे.


यात ते म्हणाले की,  उरुण हा ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो. तर सोळाव्या शतकानंतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो. यामुळे या शहराला "उरुण-इस्लामपूर" अशीच ओळख असून शहराने सामाजिक सलोखा जपला आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर "उरुणचे" अस्तित्वच नष्ट होईल. त्यामुळे, रुण इस्लामपूर' शहराच्या नामांतराच्या प्रस्तावात उरुण नावाचा समावेश करुन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याची विनंती त्यांनी या निवेदनामार्फत केली आहे.



इस्लामपूरच्या नामांतरात उरुण चा समावेश उरूण वासीयांचे साखळी उपोषण


इस्लामपूरच्या ईश्वरपूर या नव्या नामांकरणात उरूण चा समावेश व्हावा ही उरूण वासियांची आग्रहाची मागणी असून त्यासाठी ते दिनांक १ ऑगस्ट, २०२५ पासून साखळी उपोषण करीत आहेत. मात्र अद्याप राज्य मंत्रीमंडळाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे, मुख्यमंत्र्यांना याविषयी सूचना करण्याबद्दल राज्यपालांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.


 




Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी