Chintamani First Look: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर, संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृतीने वेधले लक्ष

  32

मुंबई: मुंबईतील मानाच्या गणपतीमधील एक असलेला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. आज सकाळी 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या अधिकृत इंस्टाग्राम पेजद्वारे बाप्पाची पहिली झलक सर्वांनी पाहिली. इतकेच नव्हे तर चिंतामणीची पहिली झलक पाहण्यासाठी परेलच्या वर्कशॉपसमोर मोठ्या संख्येने लोकं सकाळपासून जमलेले दिसून आले.


 


मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक म्हणून 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची ओळख आहे. त्यामुळे या गणपतीचे विशेष स्थान गणेश भक्तांच्या मनात आहे. म्हणून, यंदाच्या वर्षी चिंतामणी कोणत्या रूपात पाहायला मिळेल, याबद्दल गणेश भक्तांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. याच पार्श्वभूमीवर आज रविवारी, 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीचा आगमन सोहळा असल्याची बातमी जेव्हा कळली, तेव्हा  लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत गणेश भक्तांनी  चिंतामणी गणपतीची पहिली झलक पाहण्यासाठी, करीरोड नजीक असलेल्या परेल लोकल वर्कशॉपच्या इथे प्रचंड प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर जेव्हा बाप्पाच्या मूर्तीवरून पडदा हाटला, तेव्हा गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. संभाजी महाराजांच्या रूपातील त्याच्या प्रतिकृतीने लोकांचे लक्ष वेधून घेतले.  पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात त्यानंतर  बाप्पाचा दिमाखात आगमन सोहळा पार पडला.

Comments
Add Comment

रिअलमी पी 4 सिरीज २० ऑगस्टला भारतात होणार लाँच

मुंबई : रिअलमी कंपनी २० ऑगस्ट २०२५ रोजी भारतात आपली नवी रिअलमी P4 स्मार्टफोन सिरीज बाजारात आणत

राज्यात मुसळधार पावसाने सहा जणांचा बळी, पुण्यासाठी रेड अलर्ट

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने थैमान घातले असून विविध दुर्घटनांत सहा जणांचा मृत्यू झाल्याची

विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका

मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद

संघाची दिल्लीत दोन दिवस बैठक

संलग्न संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार मुंबई : अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.