दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट लागले आहे. मुंबईत दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना एकाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दहीहंडीसाठी रश्शी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरन चौधरी (३२) असे मृताचे नाव आहे. दहीहंडी दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दुपारी तीन वाजेपर्यंत ३० जण जखमी झाले.

मुंबई शहर भागात १८ गोविंदा जखमी झाले. यापैकी १२ जणांवर उपचार सुरू आहेत आणि सहा जणांना उपचार करुन घरी पाठवले आहेत. मुंबई पूर्व उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी ३ जणांवर उपचार सुरू आहेत तर तीन जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई पश्चिम उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी एकावर उपचार सुरू आहेत आणि पाच जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी दरम्यान मुंबईत एकाचा मृत्यू झाला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १६ जणांवर उपचार सुरू आहेत तर १४ जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे.

ठाणे जिल्ह्यात आदित्य रघुनाथ वर्मा या गोविंदाला डोक्याला दुखापत झाल्यामुळे तर कृष्णा मिठू स्वयन याला उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे. समर बन्सीलाल राजभर यालाही डोक्याला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे.
Comments
Add Comment

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच