पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

  32

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १०० मिनिटांहून अधिक काळ भाषण दिले आहे. याआधी त्यांचे सर्वात दीर्घ भाषण ९८ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लाल किल्ल्यावरून हे सर्वात मोठे भाषण दिले होते, आणि यंदा त्या विक्रमालाही मागे टाकले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच २०१५ मध्येच, लाल किल्ल्यावरून सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रम मोडला होता. त्या वेळी त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले होते आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ७२ मिनिटांच्या भाषणाचे जुने रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा स्वतःचे विक्रम मोडले आणि आता १०१ मिनिटांहून अधिक काळ भाषण देऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांनी लाल किल्ल्यावर सलग १२व्यांदा तिरंगा फडविला आहे. यापूर्वी हे फक्त जवाहरलाल नेहरू यांनीच केले होते. त्यांच्या नंतर इंदिरा गांधी यांच्या नावे सलग ११ वेळा तिरंगा फडविण्याचा विक्रम होता, जो यंदा पंतप्रधान मोदी यांनी मोडला आहे.
Comments
Add Comment

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

रोजगार योजना, सुदर्शन चक्र मिशन, जीएसटी कपात, पहिली सेमीकंडक्टर चिप, ऊर्जा स्वयंपूर्णता आणि घुसखोरीच्या मुद्यावर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून १००

भारतीय सैन्यात अग्निवीरांची संख्या वाढणार

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली चांगली कामगिरी नवी दिल्ली : केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली, तेव्हा

‘ऑपरेशन सिंदूर’मधील ३६ एअर वॉरियरना शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली: पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक व निर्णायक कारवाई करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या ३६ जवानांना

‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सैन्याच्या शौर्याची प्रशंसा नवी दिल्ली : या वर्षी आपल्याला दहशतवादाचे

“न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही”- पंतप्रधान

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ठाम भूमिका नवी दिल्ली : देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त