Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

  31

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शुक्रवारपासून सुरू असलेली संततधार आता जीवघेणी ठरत असून, काही ठिकाणी ढगफुटीच्या भीषण घटना घडल्या आहेत. नद्यांनी उग्र रूप धारण करत पूरस्थिती निर्माण केली, तर डोंगरकड्यांवरून मातीचे प्रचंड ढिगाऱ्यांचे लोट कोसळत भूस्खलनाने गावागावात भीतीचे सावट पसरवले आहे. आतापर्यंत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेपत्ता आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुरुवारी रात्री ढगफुटीचा तडाखा बसला. काही मिनिटांतच आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यांनी परिसर उध्वस्त केला. ८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो पर्यटक धोक्यात सापडून अडकले आहेत. सर्वात हृदयद्रावक घटना म्हणजे एका संपूर्ण कुटुंबाचे झालेले उद्ध्वस्तीकरण पती, पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह सापडले, तर एक लहान मुलगी अजूनही बेपत्ता आहे. तिचा शोध सुरू असून, आशा मावळत चालली आहे. पाकिस्तानात भय आणि हतबलतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हं अद्याप नाहीत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नीलम खोऱ्यात पाण्याचा कहर ५०० पर्यटक अडकले

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाच्या तडाख्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. मुजफ्फराबाद, नीलम बाग, नीलम खोरे आणि झेलम खोरे जिल्ह्यांत प्रशासनाने तातडीने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसताच, स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सर्वात गंभीर स्थिती नीलम बाग जिल्ह्यात आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, पूल वाहून गेले असून, संपूर्ण जिल्ह्याचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दरम्यान, नीलम खोऱ्यातील एका शिबिरात तब्बल ५०० पर्यटक अडकले आहेत. पाण्याच्या वेगवान लाटांनी आणि रस्ते बंद झाल्याने बचाव पथकांनाही तेथे पोहोचणे कठीण झाले आहे. अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, गावागावांत भयाचं सावट आहे. प्रशासन आणि आपत्कालीन पथके युद्धपातळीवर काम करत असली, तरी पावसाचा जोर कमी न झाल्यास संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पख्तुनव्वात ३३ लोकांचा मृत्यू

पाकिस्तानातील खैबर पख्तुनव्वा प्रांतात निसर्गाने थैमान घातलं आहे. मुसळधार पावसासह झालेल्या ढगफुटीच्या मालिकेनं अनेक जिल्ह्यांवर प्रलय ओढवला आहे. पुराच्या प्रचंड लाटांनी आणि विजांच्या कडकडाटानं ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. बाजोर जिल्ह्यातील सालारजई तालुका सर्वाधिक तडाख्यात सापडला. इथे ढगफुटी आणि वीज कोसळण्याच्या घटनेत एकाच झटक्यात १६ जणांचा बळी गेला. उपायुक्त शाहीद अली यांच्या माहितीनुसार, मृतांपैकी अनेकजण कुटुंबांसह घरात असतानाच पाण्याच्या प्रवाहात सापडले. तीन गंभीर जखमींना तातडीने खार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनसेहरा परिसरात परिस्थिती आणखी बिकट झाली. अचानक आलेल्या पुरानं एक कार क्षणार्धात वाहून गेली, ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, पावसाच्या लोंढ्यांनी वाहतूक व्यवस्था ठप्प केली असून, अनेक गावं बाहेरील संपर्कापासून पूर्णपणे तोडली गेली आहेत. पख्तुनव्वाच्या डोंगराळ पट्ट्यात अजूनही ढग दाटून आलेले असून, प्रशासनानं पुढील काही तासांसाठी अत्यंत भीषण हवामानाचा इशारा दिला आहे. पुराचा जोर कमी न झाल्यास मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

Trump-Putin Alaska Meet: ट्रम्प अलास्काला रवाना, पुतिन यांना लवकरच भेटणार, पण भेटीपूर्वीच दिली धमकी! म्हणाले...

"जर चर्चा अयशस्वी झाली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील" वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअर

व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर रशियाची बंदी

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे आदेश मॉस्को : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी

अंतराळवीर शुभांशू शुक्ला मायदेशी परतल्यावर घेणार पंतप्रधान मोदींची भेट

वॉशिंग्टन : अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) मध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा वांशिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आला आहे. ही

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबार, ३ जणांचा मृत्यू आणि ६०हून अधिक जखमी

इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात