दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ३ महिला आणि २ पुरुष आहेत. या सर्वांना मलब्यातून बाहेर काढून एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत अनेक लोक जखमी देखील झाले आहेत.


दिल्लीच्या निजामुद्दीन भागात हुमायूंच्या मकबऱ्यामागे असलेल्या पत्तेशाह दरगाहचे दोन खोल्या कोसळल्या. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या टीम्स उपस्थित आहेत. फायर ब्रिगेडने सांगितले की ५ ते ६ लोकांना आतापर्यंत मलब्यातून बाहेर काढून ट्रॉमा सेंटरला पाठवण्यात आले आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, ही घटना दुपारी ३:४५ वाजता घडली.


ही दुर्घटना हुमायूं टॉम्बच्या मागील परिसरात असलेल्या दरगाहमध्ये घडली. मलब्यात १०-१२ लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. घटनेनंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून १२ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.


डीसीपी हेमंत तिवारी यांनी सांगितले, “आत्ताच काही निश्चित सांगता येणार नाही. काही लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अजून किती लोक आत अडकले आहेत हे शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.”


दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, संध्याकाळी साडेचार वाजता गुंबदाचा भाग कोसळल्याची माहिती मिळाली.यानंतर तात्काळ जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.


गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे, या जुन्या इमारतीची छत पावसामुळे कोसळली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की ८ ते ९ लोक अजूनही मलब्यात अडकले असण्याची शक्यता आहे, आणि दमकलच्या ५ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.


हुमायूं टॉम्ब हा १६व्या शतकात बांधलेला एक ऐतिहासिक स्मारक आहे, आणि पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या अपघातामुळे काही मृत्यू झाल्याची पुष्टी पोलीसांकडून करण्यात आली आहे, आणि परिस्थितीवर निरंतर लक्ष ठेवण्यात येत आहे.


Comments
Add Comment

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे ९१ व्या वर्षी वाराणसीत निधन

वाराणसी: प्रख्यात पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे आज, २ ऑक्टोबर २०२५