खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ


पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. एका महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढल्याप्रकरणी प्रांजल खेवलकर आणखी गोत्यात सापडले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर पुणे सायबर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुणे खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर आणखी अडचणीत सापडला आहे. आता नव्या प्रकरणात, एका महिलेच्या तक्रारीनुसार खेवलकरने तिची संमती न घेता व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप आहे.  या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी आयटी अ‍ॅक्ट ६६E आणि BNS कलम ७७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामुळे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर खेवलकरचे पाय आणखीन गाळात रुतले गेले आहेत.


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत खेवलकरवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खेवलकरच्या मोबाइलमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले होते. या उघडकीनंतर राज्यभरात मोठी खळबळ देखील उडाली होती.

Comments
Add Comment

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार