Stock Market: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' उसळला! 'या' गोष्टींमुळे बाजारात चैतन्य जाणून घ्या सकाळचे सविस्तर विश्लेषण

  32

मोहित सोमण: काल युएस बाजारातील मोठ्या उसळीने बाजारात आज सकाळी आशियाई बाजारात चैतन्य पसरले होते. ज्यामध्ये आशियाई शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. गिफ्ट निफ्टीतही सत्र सुरू होण्यापूर्वी पहाटे वाढ झाली होती. जी सत्र सुरू झा ल्यावर कायम राहिली आहे. सेन्सेक्स १६४.९७ अंकाने उसळला असून निफ्टी ७९.०५ अंकाने उसळला आहे. सुरुवातीच्या कलात सेन्सेक्स बँक निर्देशांकात ८६.५५ अंकाने व निफ्टी बँक निर्देशाकांत १२०.७५ अंकाने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे ०.३३%,०.५१% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६८%,०.४३% वाढ झाली आहे. काल मिडकॅपमध्ये झालेली घसरण निर्देशांकात घसरण होण्यास कारणीभूत ठरली होती. आज मात्र मिड स्मॉल दोन्ही समभागात वा ढीचे चित्र कायम आहे.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये एफएमसीजी (०.०६%), आयटी (०.१३%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.१२%) समभागात झालेली घसरण वगळता इतर समभागात वाढ झाली. सकाळच्या सत्रातील सुरुवा तीला मेटल (१.५७%), पीएसयु बँक (०.३९%), रिअल्टी (०.७४%), हेल्थकेअर (१.०७%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (१.२९%) समभागात वाढ झाली.

युएसने काल हेडलाईन महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. किरकोळ ग्राहक निर्देशांकात (Consumer Price Index) यांमध्ये जुलै महिन्यात केवळ ०.२% वाढला आहे. खरं तज्ञांनी याहून अधिक वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आश्चर्याने महा गाई अपेक्षेपेक्षा न वाढल्याने व जवळपास जैसे थे राहिल्याने गुंतवणूकदारांना आता सप्टेंबर महिन्यातील युएस फेड व्याजकपातीची ओढ लागली आहे. चांगल्या निकालाने युएस गुंतवणूकदारांचे मनोबल आले होते. तसेच पुन्हा एकदा एनविडिया कंपनीने आपला डं का वाजवला असल्याने आणखी आश्वासकता युएस बाजारात निर्माण झाली. ज्यामुळे एस अँड पी ५०० (१.१३%) इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला होता.तर नासडाक (१.३९%), डाऊ जोन्स (१.१०%) वाढला होता. याच पार्श्वभूमीवर गिफ्ट निफ्टीसह आशियाई बाजा रातील सगळ्या बाजारात वाढ सकाळच्या सत्रात झाली.

सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.६२%), निकेयी २२५ (१.६१%), स्ट्रेट टाईम्स (१.०३%), हेंगसेंग (१.७१%), तैवान वेटेड (०.३३%), कोसपी (०.६०%), जकार्ता कंपोझिट (१.२०%), शांघाई कंपोझिट (०.५६%), सेट कंपोझिट (०.९२%) बाजारात वाढ झाली आ हे.काल डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाली होती. काल उशीरा डॉलर निर्देशांकात (Dollar Index DXY) घसरण झाली. आज सकाळी सत्र सुरू होताना डॉलर निर्देशांक ०.०७% पातळीने घसरला होता. आज डॉलरमध्ये घसरण झाल्यावर भारतीय बाजारास ह जागतिक सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अस्थिरतेच्या काळातही भारतीय व युएस बाजारपेठेतील हेडलाईन इन्फ्लेशन (महागाई) खासकरून किरकोळ (Retail) महागाईत घसरण झाल्याने शेअर बाजारात ही वाढ झाली आहे. दुसरीकडे आज सकाळ च्या सत्रात ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झाल्याने बाजाराला सकाळच्या सत्रात आधारपातळी मिळण्यास मदत झाली आहे. एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स अशा बड्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने सकाळी तेजी दिसत आहे. ट्रम्प यांनी एका च वेळी रशिया व चीनशी बोलणी सुरू केल्याने जागतिक तिढा सुटेल का ही आश्वासकता निर्माण झाल्याने बाजारात 'फील गुड' वातावरण कायम दिसत आहे. सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ०.३०% पातळीवर उसळला हो ता.

आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एनएमडीसी स्टील (१२.३३%), होनसा कंज्यूमर (११.८१%), जेएम फायनांशियल सर्व्हिसेस (६.२६%), वन ९७ (५.६८%), आरती इंडस्ट्रीज (४.३५%), सम्मान कॅपिटल (३.३०%), एफ एस एन ई कॉमर्स (३.२२%), हिंदाल्को इंडस्ट्रीज (३.११%), टिटागढ रेल (३.०७%), अलकेम लॅबोरेटरी (२.७९%), एंजल वन‌ (२.७८%), एंजल वन (२.७८%), भारत डायनामिक्स (२.७३%), बीएसई (२.६६%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (२.४४%), स्विगी (२.१९%), भारत फोर्ज (२.००%), हिताची एनर्जी (१.९८%), साई लाईफ (१.९४%), विशाल मेगामार्ट (१.९३%), सोलार इंडस्ट्रीज (१.८९%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.८८%), वेदांता (१.६७%), माझगाव डॉक (१.४९%), एचबीएल इंजिनिअरिंग (१.१६%), जिंदाल स्टील (१.०१%), एनएमडीसी (१.०९%), टाटा स्टील (०. ६८%), आयडीबीआय बँक (०.६२%), इन्फोसिस (०.२६%), एचडीएफसी (०.२४%), टाटा मोटर्स (०.२३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.५५%) समभागात (Stocks) मध्ये वाढ झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण कोरोंमंडलम इंटरनॅशनल (५.६८%), प्राज इंडस्ट्रीज (३.१७%),सोनाटा सॉफ्टवेअर (३.१७%), सुझलोन एनर्जी (२.६३%), ऑईल इंडिया (२.५६%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (२.५०%), बाटा इंडिया (१.७३%), झेंसार टेक्नॉलॉजी (१. ६२%), भारती हेक्साकॉम (१.१४%), बर्जर पेंटस (१.०२%), इंडसईंड बँक (०.८२%), पीटीसी इंडस्ट्रीज (०.४८%), आयसीआयसीआय बँक (०.२४%), विप्रो (०.११%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील सुरुवातीच्या कलावर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सकारात्मक पातळीवर उघडतील अशी अपेक्षा आहे, जसे की GIFT निफ्टीने सूचित केले आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ११० अंकांच्या किरकोळ वाढीकडे निर्देश करते. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिली असली तरी, सततच्या अस्थिरता आणि मिश्रित जागतिक संकेतांमुळे तो अजूनही दबले ला आहे. मागील सत्रात, निफ्टी सपाट उघडला आणि सुरुवातीच्या काळात जोरदार खरेदी झाली, परंतु विक्रीच्या दबावाने तो २४,५०० च्या खाली ओढला गेल्याने दिवसाचा शेवट नकारात्मक क्षेत्रात झाला. दैनिक चार्टमध्ये लांब वरच्या विकसह मंदीच्या मेणबत्तीची (Weak Candle) निर्मिती दर्शविली आहे, जी उच्च पातळीवर विक्रीचा दबाव प्रतिबिंबित करते. निर्देशांक त्याच्या अल्पकालीन EMA झोनची चाचणी घेण्यात देखील अयशस्वी झाला आणि अल्पकालीन आणि मध्यमकालीन EMA दोन्ही खाली व्यापार करत आ हे जे अंतर्निहित कमकुवतपणा (Underlying Weakness) दर्शवते. प्रमुख आधार पातळी २४४०० आणि २४३०० पातळीवर ठेवली आहेत आणि या खाली ब्रेकडाउनमुळे घसरण २४,००० पर्यंत वाढू शकते. २४६०० पातळीवर प्रतिकार दिसून येतो, त्यानंतर २४ ७००–२४८०० पातळीवर..

बँक निफ्टीमध्ये चढउताराचे सत्र होते, वरच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत होता परंतु उच्च पातळींवरून सातत्याने विक्री होत होती, शेवटी ४६७.०५ अंकांनी (०.८४%) घसरून ५५०४३.७० पातळीवर बंद झाला. दैनिक चार्टवर, त्याने इनसाइड बार पॅ टर्न तयार केला, जो खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये एकत्रीकरण आणि अनिर्णय दर्शवितो. तात्काळ आधार (Immediate Support) ५५००० पातळीवर आहे, त्यानंतर ५४७००–५४५०० पातळीवर आहे, ज्यामुळे विक्रीचा आणखी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रतिकार ५५५०० पातळीवर आणि नंतर ५५८००–५६००० पातळीवर आहे, तेजीची गती पुन्हा जिवंत करण्यासाठी या श्रेणीपेक्षा सतत ब्रेकआउट आवश्यक आहे.संस्थात्मक बाजूने, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) १२ ऑगस्ट रोजी त्यांची विक्रीची मालिका वाढवली, ३३९८ कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) निव्वळ खरेदीदार होते, त्यांनी ३५०७ कोटी किमतीच्या इक्विटीज खरेदी केल्या. सध्याच्या अनिश्चिततेचे आणि वाढत्या अस्थिरतेच्या वातावरणामु ळे व्यापाऱ्यांना विशेषतः लेव्हरेज्ड पोझिशन्ससह सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. रॅली दरम्यान आंशिक नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस (Strong Trailing Stop Loss) वापरणे हे विवेकी जोखीम व्यवस्थापन धोरणे आहेत. निफ्टी २ ४७५० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. एकंदरीत, व्यापक दृष्टिकोन सावधगिरीने तेजीत राहतो, ज्यामध्ये प्रमुख ब्रेकआउट पातळी आणि जागतिक बाजारातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले जाते.'

आजच्या सुरुवातीच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' भारतीय बाजाराच्या अलिकडच्या काळात झालेल्या लक्षणीय घसरणीकडे बार काईने लक्ष देणे आवश्यक आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून निफ्टी सलग नवीन नीचांक गाठत आहे तर बहुतेक इतर बाजारपेठा विकसित आणि उदयोन्मुख चांगली कामगिरी करत आहेत. म्युच्युअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे मोठ्या प्र माणात घरगुती गुंतवणूकदार (DII) खरेदी झाली असूनही ही घसरण दिसून आली आहे. ऑगस्टमध्ये, आतापर्यंत, FII ने एक्सचेंजेसमधून १८६२० कोटी रुपयांना इक्विटी विकल्या आहेत. 46272 कोटी रुपयांच्या DII खरेदीमुळे ही परदेशी संस्थात्मक गुंतवणूक दार (FII) विक्री पूर्णपणे मागे पडली आहे. तरीही निफ्टी २४७६८ पातळीवरून २४४८७ पातळीपर्यंत खाली आला आहे.का? ट्रम्पच्या कठोर शुल्कांमुळे आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला आहे आ णि परिणामी शॉर्ट्समध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे बाजार खाली आला आहे. मंद कमाईची वाढ, वाढलेले मूल्यांकन आणि FY26 साठी ८ ते १०% कमाई वाढीचा माफक अंदाज यामुळे अस्वलांना शॉर्ट पोझिशन्स वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. भावनांम ध्ये अचानक बदल झाल्यामुळे बाजारात शॉर्ट कव्हरिंग आणि तीक्ष्ण पुनर्प्राप्ती होऊ शकते. ट्रम्प-पुतिन चर्चा एक प्रदान करू शकते सकारात्मक ट्रिगर आहे पण त्याबद्दल निश्चितता नाही. मालमत्ता वाटपासाठी ही योग्य वेळ आहे. ३ वर्षे आणि त्याहून अधिक काळ दीर्घकालीन गुंतवणूक क्षितिज असलेले गुंतवणूकदार बँकिंग, टेलिकॉम, कॅपिटल गुड्स, एव्हिएशन आणि निवडक मिडकॅप आयटीमध्ये बऱ्यापैकी मूल्यवान लार्जकॅप शेअर्स जमा करू शकतात. या विभागांमधील जोखीम-प्रतिफळ (Risk Reward) गुंतवणुकी साठी अनुकूल आहे.'

आजच्या सुरुवातीच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,'काल कमी वळण (Turn Lower) असूनही, आपण कालच्याच मतावर ठाम राहू की २४४५० पातळीने माघार घेतल्याशिवाय, सध्या २४०४९ पातळीवर असलेल्या २०० दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) कडे जाणारी गर्दी दिसणार नाही. सुरुवातीला वरच्या दिशेने प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे, परंतु २५००० पातळीच्या मार्गावर परत येण्या साठी आपल्याला २४५६० पातळीच्यावर धक्का लागेल.'

यामुळेच आजच्या बाजारातील निफ्टी पातळीशिवाय ट्रम्प यांच्या टॅरिफ विषयी नवी घडामोड अथवा फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत नवे भाष्य, सोन्याच्या व तेलात झालेल्या घसरणीमुळे, रुपयांच्या वाढीमुळे एकूणच मजबूत फंडामेंटल असले तरी मिडस्मॉल कॅप मधील रॅली ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह किती वाढते यावर अखेरच्या सत्रातील निर्देशांकातील पातळी निश्चित करतील.
Comments
Add Comment

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियासोबत साखरपुडा संपन्न, पाहा कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्याचा मुलगा, अष्टपैलू

लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दल घेते दिवसाला सव्वा लाख भाडे

भाडे कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, डॉक्टरचा जागीच मृत्यू!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एका दुःखद अपघातात ३२ वर्षीय डॉक्टर प्रियांका अहिर यांचा मृत्यू झाला. ही

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या

मुंबई गणेशोत्सवासाठी सज्ज, चौपाटीवर विसर्जनाची तयारी!

मुंबई : गणेश चतुर्थीच्या आगमनामुळे मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली आहे, विशेषतः गिरगाव चौपाटीवर, जे विसर्जनाचे एक