अंदमान निकोबारमध्ये शिवजयंती महोत्सवाचे आयोजन; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार  

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा १९ फेब्रुवारी रोजी ३९६ वी जयंती आहे. यंदा ३९६ वा शिवजयंती महोत्सव अंदमान निकोबार येथील पोर्टब्लेअर या ऐतिहासीक बेटावर साजरा होणार आहे. अंदमान निकोबार मधील शिवजयंती महोत्सवास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. यंदाचा शिवजयंती महोत्सव आपण अंदमान निकोबार या ऐतिहासीक केंद्रशासीत प्रदेशात साजरा करणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.


भारतीय स्वातंत्र्य लढयात अंदमान निकोबारचे ऐतिहासीक महत्व आहे. अंदमान निकोबार येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा झाली होती. अंदमान निकोबार येथील तुरंगात ब्रिटीशांनी पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र सैनिकांना डांबुन ठेवले जात होते. अंदमान निकोबार येथे भारतीय स्वांतत्र लढयाच्या अनेक ऐतिहासीक खुणा आहेत. या ऐतिहासीक अंदमान निकोबारच्या पोर्टब्लेअर येथील मराठी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यास ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ