भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या दृष्टीने भाजपचे पहिले पाऊल

शालेय वस्तूंची जेम पोर्टलवरून करा, नाहीतर डिबिटी करा


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर पहिला घाव घालत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापालिकेच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. महापालिका शाळेतील मुलांना मोफत वितरीत करण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंची खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून त्वरीत व्हावी अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. एवढेच नाहीतर महापालिकेने शालेय वस्तू वाटण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डिबिटी) चाही विचार करावा. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी, अशीही सूचना आमदार साटम यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.


मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार अमीत साटम यांनी असे नमूद केले की, अनेक वर्षांपासून महापालिका शालेय विद्यार्थ्यांना गणवेशापासून स्टेशनरीपर्यंत २७ विविध वस्तू मोफत वाटत आहे. सध्या या वस्तू कंत्राटदारांमार्फत खरेदी केल्या जातात. अनेकदा हे कंत्राटदार उत्पादकांकडून वस्तू घेऊन महापालिकेला वाढीव किंमतीत विकत असल्याचे निदर्शनास आल्याचे आमदार अमीत साटम यांनी म्हटले आहे.


भाजप भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या बांधिलकीचा असल्याचा पुनरुच्चार करत अमित साटम यांनी या २७ वस्तूंची थेट खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून करण्याची मागणी केली. तसेच यापुढे शालेय वस्तूंसह जेंडर बजेट अंतर्गत महिलांना वितरित होणाऱ्या सर्व सामग्रीची खरेदीही जेम पोर्टलवरूनच केली जावी. यामुळे महानगरपालिकेच्या निधीची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, खरेदीमध्ये पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल. अशा पद्धतीने खरेदी केल्यास वाढीव किंमतीमध्ये महापालिकेस वस्तू देता येणार नाहीत, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,