आरबीआयने बंदी मागे घेतल्यानंतर वन ९७ कम्युनिकेशन शेअर्समध्ये ५% उसळी 'हे' आहे कारण

प्रतिनिधी: वन ९७ कम्युनिकेशन्स (One 97 Communications Paytm) कंपनीची उपकंपनी पेटीएम पेमेंटस सर्विसेस लिमिटेडवरील थर्ड पार्टी अँग्रीगेटरची बंदी आरबीआयने हटवली असल्याने शेअर ५२ आठवड्यातील (All time High) सर्वाधिक पातळी वर पोहोचला आहे. काल उशीरा आरबीआयने पेटीएम पेमेंटसा ऑनलाईन अँग्रीगेटर म्हणून अखेरीस परवानगी दिल्याने शेअर्समध्ये आज तेजी आली आहे. आज सकाळीच शेअर बाजारातील सत्राच्या सुरुवातीलाच शेअर ५ ते ६% उसळला होता. सकाळी १२ वा जेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४.८७% वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकवर कारवाई करत मोठा धक्का फिनटेक क्षेत्राला दिला होता. त्यावेळी पेटीएम पेमेंट बँक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक विज य शेखर शर्मा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती.

सिस्टीम ऑडीट प्रकरणांत आरबीआयने ही मोठी कारवाई नोव्हेंबर २०२२ मध्ये केली होती. अनेक खात्यांची केवायसी अनियमितता असतानाही व्यवहार केल्याचे आढळल्याने नियामकाने कारवाई केली. नुकत्याच आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे की,'आरबी आयच्या पत्रात नमूद केले आहे की नोव्हेंबर २०२२ मध्ये पीपीएसएलवर लावण्यात आलेले व्यापारी ऑनबोर्डिंग निर्बंध मागे घेण्यात आले आहेत, परंतु फर्मला सायबर सुरक्षेसह सिस्टम ऑडिट करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.'त्यामुळे आरबीआयने हे निर्बंध मागे घेतले असल्याने आता कंपनीला ऑडिट रिपोर्ट पुढील सहा महिन्यांच्या आत आरबीआयला सोपवणे बंधनकारक असणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेने अस्तित्त्वात असलेल्या ग्राहकांच्या व्यवहारावर अथ वा कंपनीच्या कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नाही केवळ त्यांना थर्ड पार्टी अँग्रीगेटर (Third Party Aggregator) म्हणून नाकारल्याने पेमेंट सिस्टीमसाठी दुसऱ्या बँकेकडे वळवण्यात आले होते.

नुकतीच पेटीएमने आपली कंपनी संपूर्णपणे स्वदेशी केली होती. चीनी भागभांडवलातून कंपनी बाहेर पडल्याने बाजारात गुंतवणूकदारांना या विविध कारणांमुळे आश्वासकता निर्माण झाली. वॉरेन बटाच्या बर्कशायर हॅथवेप्रमाणेच, अँटफिननेही पेटीएममध्ये आपला हिस्सा तोट्यात विकला ब्लॉक डील माध्यमातुन विकला होता. बहुतांश ब्रोकरेज व शेअर बाजार विश्लेषकांनी 'Buy' Call दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी दिसत आहे. गेल्या एका महिन्यात त्याच्या शेअरची किंमत १५% वाढली आहे आणि गेल्या सहा म हिन्यांत जवळपास ५०% वाढली आहे. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात या शेअरने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे, परंतु तो त्याच्या आयपीओ मूळ किमती प्राईज बँडपेक्षा २१५० च्या खालील पातळीवर आहे.
Comments
Add Comment

जम्मू-काश्मिरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना उडाला भडका

श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद