भारतीय क्रिकेटर आकाशदीपवर RTOची कारवाई, बिना नंबर प्लेटची फॉर्च्युनर कार चालवणे पडले महागात


लखनऊ: भारतीय क्रिकेटपटू आकाशदीप सिंहला नुकतीच घेतलेली टोयोटा फॉर्च्युनर कार अडचणीत आणणारी ठरली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत, नोंदणी आणि उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) शिवाय गाडी चालवल्यामुळे उत्तर प्रदेश परिवहन विभागाने त्यांच्यावर आणि गाडी विकणाऱ्या डीलरशिपवर कठोर कारवाई केली आहे.



काय आहे प्रकरण?


आकाशदीप याने नुकतीच लखनऊमधील मेसर्स सनी मोटर्स या डीलरकडून एक नवीन फॉर्च्युनर खरेदी केली होती. त्यांनी आपल्या कुटुंबासोबत नव्या गाडीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र, तपासणीत असे समोर आले की, गाडीची विक्री ७ ऑगस्ट रोजी झाली, विमा ८ ऑगस्ट रोजी काढला गेला, परंतु रोड टॅक्स भरला गेला नव्हता आणि नोंदणी प्रक्रिया अपूर्ण होती. तरीही, ही गाडी सार्वजनिक रस्त्यांवर वापरली जात होती.



झालेली कारवाई


परिवहन विभागाने आकाशदीपला मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ३९, ४१(६) आणि २०७ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. नोंदणी, HSRP आणि वैध विमा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गाडी सार्वजनिक रस्त्यावर न चालवण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. नियम मोडल्यास गाडी जप्त केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.



डीलरवर कारवाई


डीलर मेसर्स सनी मोटर्स यांनी नोंदणी पूर्ण न करताच आणि HSRP न लावता गाडीची डिलिव्हरी दिली, हे केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४४ चे उल्लंघन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे परिवहन विभागाने डीलरच्या 'ट्रेड सर्टिफिकेट' (व्यापारी परवाना) ला एक महिन्यासाठी निलंबित केले आहे. या काळात डीलर कोणतीही गाडी विकू, नोंदणी करू किंवा डिलिव्हर करू शकणार नाही. जर या नियमांचे उल्लंघन झाले तर, परवाना रद्द केला जाईल


Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना