सराव सुरू होता, महेश वरच्या थरावर पोहोचण्यासाठी वेगाने हालचाली करत होता. पण चढत असताना त्याचा तोल आणि घात झाला. तो जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी जास्त वेळच मिळाला नाही.
दहिसर पोलिसांनी महेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरू आहे.
यंदा १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. हजारो गोविंद पथके या उत्सवात सहभागी होतात. जिद्दीने आणि उत्साहाने गोविदा पथके सण साजरा करतात. मानवी मनोऱ्यांचा थरार साऱ्यांना अनुभवायला मिळतो. दिवसभर विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडून मोठमोठी बक्षीसे गोविंदा पथक पटकावतात. दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. यामुळे सुरक्षेची काळजी घेणे महत्वाचे असते. ताज्या घटनेमुळे गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.