नवी मुंबई : नेरुळमधील प्रमुख हृदयविकार उपचार केंद्र असलेल्या सुश्रूषा हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. ही घटना सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून, रुग्णालयातील संगणक यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्यानंतर काही क्षणातच आग पसरली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. रुग्णांना जवळील सामाजिक संस्थेच्या हॉलमध्ये हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय ...
आग विझविण्यासाठी वाशी, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे प्रयत्न करत असून, घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, रुग्णालयातील संगणक यंत्रणा व काही वैद्यकीय उपकरणांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.