स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, तर दोन्ही उपमुख्यमंत्री...

  36

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर


मुंबई: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी ०९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

अजित पवार बीड तर एकनाथ शिंदे ठाण्यात 


यंदा अजित पवार बीडला जाणार आहेत. त्यामुळे, पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत. तर रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आदिती तटकरे यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर, नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील ध्वजारोहण सोहळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

बीड- अजित आशाताई अनंतराव पवार

नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

अहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे - पाटील

गोंदिया- छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ

सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन

पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

अमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसे

यवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोड

रत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंत

धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

नांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावे

चंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईके

सातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

मुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलार

वाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे

रायगड- कु.आदिती वरदा सुनिल तटकरे

लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

नंदुरबार- ॲड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे

हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ

भंडारा- संजय सुशिला वामन सावकारे

छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट

धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे

रायगड- अदिती सुनील तटकरे

अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

कोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर

गडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल

वर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर आणि

परभणी- श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर

राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चित झाले नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात यावे, असेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Add Comment

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे

खेड येथील अपघाताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

मुंबई: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप

मराठ्यांचा अभिमान उजळला! रघुजींचा वारसा सरकारच्या हाती

मुंबई : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे

Pankaja Munde : "तुकड्यांचा मोह नको, स्वाभिमान जपा – मुंडेसाहेबांचा अमूल्य सल्ला"; पंकजा मुंडे झाल्या भावुक

लातूर : “मुंडेसाहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं. त्यामुळे त्या वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही

Pune Accident: श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणारी पिकअप दरीत कोसळली, ६ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी

खेड: पुण्यातील खेड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त महिला

तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक, शिवभक्तांचा उत्साह

ब्रह्मगिरी फेरीसाठी मोठी गर्दी नाशिक (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या