मुंबई : पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. १२ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो, १३ ऑगस्टला हे क्षेत्र आणखी मजबूत होईल. सध्याची हवामानस्थिती या कमी दाबाच्या पट्ट्याला अनुकूल आहे.
त्यामुळे पुढील आठवड्यात देशभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.