एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल ५० लाख सवलतीच्या आसनांची विक्री १० ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे.


भाड्यांची सुरुवात फक्त १,२७९ रु पासून देशांतर्गत प्रवासासाठी तिकिटांचे दर केवळ १,२७९ रु पासून सुरू होत असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किमान भाडे ४,२७९ रु इतके आहे. हे दर १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या प्रवास कालावधीस लागू आहेत. यामध्ये ओणम, दुर्गापूजा, दिवाळी आणि नाताळसारखे मोठे सण समाविष्ट आहेत. तिकिटे विमान कंपनीच्या संकेतस्थळावर, मोबाईल अ‍ॅपवर आणि सर्व प्रमुख बुकिंग चॅनेल्सवर उपलब्ध आहेत.





प्रवाशांसाठी विविध भाडेवर्ग


एक्सप्रेस लाइट– चेक-इन सामानाशिवाय किफायतशीर पर्याय. फक्त अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध. देशांतर्गत १,२७९ रु आणि आंतरराष्ट्रीय ४,२७९ रु पासून.


एक्सप्रेस व्हॅल्यू – चेक-इन सामानासह भाडे; देशांतर्गत १,३७९ रु आणि आंतरराष्ट्रीय ४,४७९ रु पासून.


एक्सप्रेस बिझ – ५८ इंचापर्यंत सीट पिच असलेली प्रीमियम केबिन सेवा. अलीकडे ताफ्यात समाविष्ट ४० हून अधिक नव्या विमानांवर उपलब्ध.


लॉयल्टी मेंबर्स व विशेष गटांसाठी लाभ


लॉयल्टी प्रोग्राम सदस्यांना एक्सप्रेस बिझ भाड्यावर २५% सवलत तसेच अतिरिक्त सामान, ‘गुर्मेअर’ गरम जेवण, सीट निवड, प्राधान्य सेवा व अपग्रेडवर २० टक्के सवलत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, संरक्षण दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष भाडेदर सुरूच राहतील.



वाढता ताफा व जाळे


११६ विमानांचा ताफा असलेली कंपनी दररोज ५०० हून अधिक उड्डाणे करते. ती ३८ देशांतर्गत आणि १७ आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांना जोडते. “टेल्स ऑफ इंडिया” उपक्रमाअंतर्गत विमानांच्या शेपटावर बंधणी, अजरख, पटोला, वारली, ऐपण आणि कलमकारीसारख्या पारंपरिक कापड डिझाईन्सचा समावेश करून भारताच्या सांस्कृतिक वारशाला सलाम केला जातो.


भारत–मध्यपूर्व मार्गांवर विशेष उपस्थिती राखत, प्रवाशांना प्रशस्त आसन, चविष्ट गरम जेवण आणि विविध गरजांना पूरक भाडेवर्ग उपलब्ध करून देत एअर इंडिया एक्सप्रेसने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रवास अधिक परवडणारा आणि आनंददायी केला आहे.

Comments
Add Comment

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात