कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेवरून केंद्र आणि राज्य सरकारमधील न्यायालयीन वाद राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मिटला होता. त्याचाच भाग म्हणून जागा कारशेडसाठी देण्याच्या निर्णयाविरोधात केलेली याचिका केंद्र सरकारने मागे घेतली होती. तथापि, या जागेबाबत खासगी विकासक आणि राज्य सरकारमधील वाद कायम होता. या वादावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय देताना खासगी विकासकांची याचिका फेटाळली. या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. ही जागा यथास्थिती ठेवण्याबाबत दिलेला अंतरिम आदेशही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने रद्द केला.


या जागेबाबतचा वाद केंद्र व राज्य सरकारने मिटवला असला आणि केंद्र सरकारने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका मागे घेतली असली तरी आपली यासंदर्भातील याचिका प्रलंबित आहे, असे खासगी विकासक महेश गोराडिया यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. तसेच, अंतरिम आदेश आपल्या आणि केंद्र सरकारच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना देण्यात आला होता हेही गोराडिया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या प्रकरणी तिन्ही पक्षकारांच्या वकिलांनी सविस्तर युक्तिवाद केला होता. त्यानंतर, न्यायालयाने डिसेंबरमध्ये या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता.


दरम्यान, मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेली कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा केंद्र सरकारने आधीच राज्य सरकारला उपलब्ध केली आहे, अशी माहिती राज्य सरकारने यापूर्वीच न्यायालयाला दिली होती. ही जागा परवडणाऱ्या घरांसाठी केंद्र सरकराने राज्य सरकारला उपलब्ध केली होती. त्यामुळे, ही जागा कारशेडसाठी वापरू देण्याच्या विनंतीबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू असल्याचेही सरकारने न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे, जागेच्या मालकीवरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी न्यायालयानेही केंद्र व राज्य सरकारला वेळ दिला होता. त्यानंतर, केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करताना राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात केलेली याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. परंतु, गरोडिया यांनी या प्रकरणी आपली याचिका प्रलंबित असल्याचे सांगून त्यावर सुनावणी घेण्याची मागणी केली होती.

Comments
Add Comment

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात