जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांसह साचलेली कचरा आणि त्यापासून पसरलेली दुर्गंधीची जळमटेच आता महापालिकेने हटवून या पुलाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीतील पूलाच्या खालील भाग साफ करण्यात आल्याने कधी नव्हेतर जे जे उड्डाणपूलाच्या खाली भाग जळमटे दूर केल्याने सुंदर दिसू लागला आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांसह पदपथांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आल्यानंतर महापालिकेच्या बी विभागाच्यावतीनेही डोंगरी,मोहमद अली रोड, मस्जिद बंदर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे. बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी महापालिका परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यापासून या मुस्लिम बहुल परिसरात जिथे महापालिकेच्यावतीने कारवाई करण्याची हिंमत दाखवली जात नाही तिथे आता कारवाई केली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शरीफ देवजी स्ट्रीट अर्थात चकला स्ट्रीट येथील वाढीव बांधकामे तसेच पदपथ अडवून केलेले बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. एवढे मस्जिद बंदर येथीलही बांधकामे आणि अतिक्रमण हटवतानाच मकदुम अली महिमी उड्डाणपूल अर्थात जे जे उड्डाणपूलाखाली सर्व अतिक्रमणांपासून तो तिथे वर्षांनुवर्षे जमा झालेला कचरा हटवून पुलाखालील परिसर स्वच्छ सुंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीत पुलाखालील परिसरात जो बकालपणा दिसत होता, तो बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी आपल्या चमुसह दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता वाहनातून प्रवास करतानाही पुलाखालील परिसराचे स्वच्छ आणि सुंदर दर्शन होताना दिसणार आहे. तसेच पुलाखालील भागांमधील पदपथांवर अनावश्यक कठडे बांधून ठेवले आहेत तेही तोडून टाकण्यावर भर दिला आहे.

Comments

Ashok Tari    February 13, 2026 10:59 PM

It's good decision of bmc so look at jogeshwari and andheri

Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा