लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि आता अपात्र जाहीर झालेल्या २६ लाख जणींची चौकशी होणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वर्षभरापासून एक कोटी पेक्षा जास्त महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आार्थिक मदत दिली जात आहे. पण विधानसभा निवडणुकीनंतर लाभार्थ्यांची कठोर छाननी सुरू झाली आहे. या छाननीत अपात्र ठरलेल्या २६ लाख महिलांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सरकारी अधिकारी घरोघरी जाऊन चौकश करणार आहेत.

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै २०२५ चा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. हा हप्ता जमा केल्यानंतर राज्य शासनाने अपात्र ठरलेल्यांच्या चौकशीचे संकेत दिले आहेत. चौकशी करण्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेशाचं पत्र देण्यात आलं आहे.

जिल्हा पातळीवरील महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही अपात्र लाभार्थी महिला शोधण्याची मोहीम आता सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र दोन पेक्षा जास्त आणि 21 ते 65 वर्षे वयोगटात न बसणाऱ्या तब्बल 26 लाख महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. या महिलांची यादी महिला आणि बालकल्याण विभागाने तयार केली आहे.

लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरुच राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरूच राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. लाडक्या बहिणींना मिळत असलेल्या १,५०० रुपयांच्या हप्त्यात लवकरच आणखी वाढ करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मोदी सरकारच्या लखपती दीदी योजनेचाही राज्यातील महिलांना लाभ होत आहे. महाराष्ट्रात २५ लाख लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच ही संख्या एक कोटींवर नेणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची

आता नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर केवळ अर्ध्या तासात

मुंबई: दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरला जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने

नवरात्रोत्सवात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. संपूर्ण मुंबईत सणाची तयारी जोरात सुरू आहे. शहरभर मंडप,

मुंबईत 'नमो युवा रन' चा जल्लोष!, मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवत केली दिमाखात सुरुवात

मुंबई: भाजप आणि त्यांची युवा शाखा, भाजयुमो, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून पुढील १५ दिवस "सेवा पंधरवडा" उपक्रम

समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार  मुंबई: मुंबईच्या समुद्र