SBI Q1Results: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा तिमाही निकाल जाहीर

  32

प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेली बँक म्हणजेच एसबीआयने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेला पहिल्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर १२.५% निव्वळ नफा अधिक कमावला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील १७०३५ कोटींच्या तुलनेत वाढत या तिमाहीत १९१६० रूपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) यामध्ये मागील वर्षी तिमाहीतील ४११२६ कोटींच्या तुलनेत घसरत या तिमाहीत ४१०७३ कोटींवर पोहोचला. बँकेच्या उत्पन्नात मागील वर्षाच्या तिमाहीतील १.२२ लाख कोटीवरुन १०.३% मोठी वाढ होत १.३५ लाख कोटीवर पोहोचले आहे.

बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १५.४९% वाढ झाली असून नफा ३०५४४ कोटींवर पोहोचला आहे. बँकेच्या निव्वळ व्याज मार्जिंन (Net Inter est Margin NIM) मध्ये मात्र ३२ बेसिस पूर्णांकाने (bps) घट झाली. बँकेच्या विना व्याज उत्पन्नातही (Non Interest Income NII) मध्ये ५५.४०% वाढ होत उत्पन्न १७३४६ कोटींवर पोहोचले आहे. व्यवसायाच्या बाबतीत, एकूण कर्जे ११.६१ टक्क्यांनी वाढून ४२.५५ लाख कोटी रुपये झाली, जी विविध विभागांच्या वाढीमुळे झाली. किरकोळ वैयक्तिक कर्जे (Retail Personal Loan) १ २.५६ टक्के, एसएमई कर्जे (SME Loan) १९.१० टक्के, कृषी कर्जे (Agricultural Loan) १२.६७ टक्के आणि कॉर्पोरेट कर्जे (Corporate Loan) ५.७० टक्के वाढली.

बँकेच्या एकूण ठेवी ११.६६ टक्क्यांनी वाढून ५४.७३ लाख कोटी रुपये झाल्या आहेत. तसेच माहितीनुसार, चालू खात्यातील ठेवी ३०.६९ टक्के आणि बचत बँक ठेवी ४.७१ टक्के वाढल्या. सीएएसए (CASA) ठेवी प्रमाण ३९.३६ टक्के होते, जे गेल्या वर्षीच्या ४०.७० टक्क्यांपेक्षा किंचित कमी होते.बँकेच्या एकूण ठेवी (Total Deposits) ११.६६ टक्क्यांनी वाढून ५४.७३ लाख कोटी रुपये झाल्या, चालू खात्यातील ठेवी ३०.६९ टक्क्यांनी वाढल्या आणि बचत बँक ठेवी ४.७१ टक्क्यांनी वाढल्या. कासा (CASA) प्रमाण ३९.३६ टक्के राहिले जे गेल्या वर्षीच्या ४०.७० टक्क्यांपेक्षा किंचित कमी आ हे.

मालमत्तेची गुणवत्ता (Asset Quality) मजबूत होत राहिली आहे. एकूण एनपीएत मालमत्ता (Non performing asset NPA) प्रमाण पहिल्या तिमाहीत (Q1FY25) २.२१ टक्क्यांवरून १.८३ ट क्क्यांपर्यंत सुधारले आणि निव्वळ एनपीए (NPA) प्रमाण ०.५७ टक्क्यांवरून ०.४७ टक्क्यांपर्यंत घसरले. तरतूद कव्हरेज रेशो (PCR) ७४.४९ टक्के होता.
Comments
Add Comment

ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब अमेरिकेवरच आदळला! भारताबरोबरच या २ देशांनीही दिला दणका

टॅरिफमुळे अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा करार अडचणीत नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

येथे झाली ठाकरे बंधूंची युती; ठाकरे गट १९ तर मनसे २ जागांवर लढणार!

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलची एन्ट्री मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

राखीने जोडले दोन अनोळखी कुटुंब, अवयवदानाने निर्माण केले नवे नाते!

मुंबई : रक्षाबंधनाच्या अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी सोहळ्यात, मुंबईच्या १६ वर्षीय अनामता अहमदने गुजरातमधील

रत्नागिरीत निवृत्त शिक्षिकेचा 'या कारणासाठी' केला खून

रत्नागिरी : धामणवणे (ता. चिपळूण) येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय ६८) यांचा खून झाला. या प्रकरणाचा

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक