गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून सुटणाऱ्या जादा एसटी बससाठीही वेगानं होतंय आरक्षण

  21

मुंबई : यंदा २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणात जाणाऱ्या संख्या मोठी आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबई महानगर क्षेत्रातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने जादा गाड्यांचीही व्यवस्था केली आहे. यापैकी ५० टक्के गाड्यांचे आरक्षण आतापर्यंत झाले आहे. गणेशोत्सवापर्यंत सर्व गाड्यांचे आरक्षण पूर्ण होईल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

नियमित एसटी स्थानकांतील गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळासाठी एसटी महामंडळाने मुंबई महानगर क्षेत्रात तात्पुरते ४० बस थांबे निश्चित केले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बसथांब्यावरून कोकणात जादा गाड्या पाठवण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणासाठी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याची घोषणा महामंडळाने केली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष गाड्यांमध्ये सवलत आहे. पण नियमित गाड्यांच्या आरक्षणावर १५ टक्के सवलत जादा गाड्यांसाठी लागू करण्यात आलेली नाही. जादा गाड्यांपैकी १,५४७ गाड्यांचे सामूहिक आणि ५३३ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे. सध्या १०६ गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.

गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील कोणकोणत्या थांब्यांवरुन सुटणार बस ?

मुंबई सेंट्रल - साईबाबा, काळाचौकी, गिरगाव, कफ परेड, काळबादेवी, महालक्ष्मी
परळ - सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल (जोगेश्वरी)
कुर्ला नेहरूनगर - बर्वेनगर, सर्वोदय, टागोरनगर, घाटला, डी.एन. नगर, गुंदवली, आनंदनगर, शास्त्रीनगर, पार्ले, खेरनगर, वांद्रे, शीव
ठाणे - लोकमान्यनगर, श्रीनगर, विटावा, भाईंदर, नॅन्सी कॉलनी, मालाड, डहाणूकरवाडी / चारकोप, महंतचौक, संकल्प सिद्धी गणेश, भांडुप (पश्चिम आणि पूर्व), मुलुंड
विठ्ठलवाडी - बदलापूर, अंबरनाथ
कल्याण - डोंबिवली
नालासोपारा - नालासोपारा आगार
पनवेल - पनवेल आगार
उरण - उरण आगार
वसई - वसई आगार
अर्नाळा - अर्नाळा आगार
Comments
Add Comment

ओला उबेरला आव्हान देणार भारत टॅक्सी

मुंबई : ओला, उबेर या खासगी अ‍ॅप आधारित सेवांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी देशात सहकारी तत्वावर ‘भारत टॅक्सी ’

पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसा ब्लॉक नाही

सांताक्रूझ, माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक मुंबई : शनिवार मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग

अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला मुदतवाढ

मुंबई : अकरावी अर्थात FYJC प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांची प्रक्रिया झाली आहे. आता अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीची

गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी; तारखेचा घोळ?

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी

‘माधुरी’वर उपचारासाठी महाराष्ट्रात योग्य जागेचा प्रश्न

मुंबई: नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘माधुरी’(महादेवी) हत्तिणीच्या घरवापसीबाबत मुंबईत बैठका सुरू असताना पेटाने लेटर

Mumbai Nagpur Special Train : मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास आलीच नाही! प्रवासी भडकले गीतांजली एक्स्प्रेस अडवली

मुंबई: मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटून देखील आली नसल्याने प्रवाशाचा प्रचंड संताप झालेला पाहायला मिळत आहे.