भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ

  60

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.



भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख ५० हजार ५९० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले. याआधी २०२३ - २४ या आर्थिक वर्षात भारताने एक लाख २७ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. देशाच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक उल्लेखनीय बाब आहे. याआधी २०१९ - २० या आर्थिक वर्षात भारताने ७९ हजार ०७१ कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. सोप्या शब्दात सांगायचे तर अवघ्या पाच वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या ऐतिहासिक कामगिरीची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन दिली.

भारत सरकार, संरक्षण साहित्यासाठी संशोधन करणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळा, संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे सरकारी आणि खासगी कारखाने तसेच या कारखान्यांना मदत करणारे इतर लहान - मोठे कारखाने या सर्वांच्या संघटीत प्रयत्नांमुळेच देशाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही सांघिक कामगिरी आहे. या कामगिरीमुळे हे सिद्ध होते की भारत संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यास सक्षम आहे. देशाने संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवनवे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आपण आणखी मोठी भरारी घेऊ, असाही विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

भारताच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात सरकारी कंपन्यांचा वाटा ७७ टक्के आणि खासगी कंपन्यांचा वाटा २३ टक्के आहे. देशाच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा वाटा मागील आर्थिक वर्षात २१ टक्के होता, जो आता दोन टक्क्यांनी वाढला आहे.
Comments
Add Comment

मोदींच्या हस्ते तीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे एका विशेष समारंभात तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा

उत्तरकाशीत ढगफुटी, पूर, भूस्खलन; महाराष्ट्रातील एक महिला पर्यटक अद्याप बेपत्ता

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला आणि पूर

ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीचे भारताकडून स्वागत

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

पंतप्रधान आज कर्नाटकात, नागपूर-पुणेसह तीन वंदे भारत एक्सप्रेसना दाखवणार हिरवा झेंडा

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळूरु इथल्या

उत्तरकाशीच्या धारली आणि हर्षील गावाची परिस्थिती अजूनही बिकट! २५० लोकं अजूनही अडकलेले

उत्तरकाशी: उत्तरकाशीच्या धारली गावात झालेल्या आपत्तीनंतर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. धारलीकडे जाणारे सर्व

भारत निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत