महापालिकेत पुन्हा ११५ नगरसेवक बसणार

प्रभाग रचना प्रारूप आराखडा शासनाकडे सादर


प्रभागांची २९ संख्याही कायम


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून, मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. २०१७ मध्ये असलेल्या प्रभाग रचनेप्रमाणेच याहीवेळी प्रभाग रचना करण्यात आल्याने निवडणुकीसाठी २९ प्रभाग राहणार असून, ११५ एवढीच नगरसेवक संख्या सुद्धा कायम असणार आहे.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि शासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभागांची रचना कशा प्रकारे करण्यात यावी यासंदर्भात परिपत्रक काढून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना कळविले आहे. वसई-विरार महापालिका 'क' वर्गामध्ये मोडत असल्याने येथील प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून केल्या जात आहे.


दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार वसई-विरार शहर पालिकेने आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत यापूर्वी २१ मे २०२२ रोजी काढली होती व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर १ जून ते ६ जून २०२२ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर १३ मे २०२२ रोजी पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ आरक्षणाची अधिसूचना महापालिकेने प्रसिद्ध केली. त्यावेळी सदस्य संख्या ११ ने वाढवून १२६ करण्यात आली होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी जागांचा मुद्दा निवडणुकीसाठी निकाली निघाला आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग अशाप्रकारे २०१७ मध्ये ज्या प्रमाणे प्रभागांची रचना करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभागरचना प्रारूप आराखडा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात आली असून, प्रारूप आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. २८ प्रभागात चार नगरसेवक तर २९ व्या प्रभागात ३ अशाप्रकारे २९ प्रभागात ११५ नगरसेवकांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या प्रभाग रचना प्रारूप आराखड्याला २१ ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाकडून मान्यता घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये