Thursday, March 26, 2026

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरून झाला होता वाद

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरून झाला होता वाद
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या निजामु्द्दीनमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादात हुमाचे भाऊ आसिफ कुरेशी यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल बाजार लेन परिसरात रात्री उशिरा स्कूटीला गेटवरून बाजूला लावण्यावरून वाद झाला होता. या वादात आरोपींनी आसिफ कुरेशीवर हल्ला केला. गंभीररित्या जखमी झालेल्या आसिफला रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीच्या पत्नीचे आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे की छोट्याशा गोष्टीवरून झालेल्या वादात आरोपींनी निघृणपणे हत्या केली. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या माहितीनुसार पार्किंगवरून याआधीही आसिफ यांचा त्या लोकांशी वाद झाला होता. माझे पती कामावरून परतल्यानंतर त्यांना घरासमोर शेजाऱ्यांनी लावलेली स्कूटी दिसली. ती बाजूला करण्यास सांगितले. मात्र शेजाऱ्यांनी शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. तसेच धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा