"आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना घडली. पावसाच्या जोरदार सरींमुळे रस्त्याच्या कडेला असलेलं एक प्रचंड झाड मुळासकट उखडून प्रवाशांनी भरलेल्या रोडवेज बसवर कोसळलं. या अचानक घडलेल्या घटनेत जागीच हाहाकार माजला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या आक्रोशामुळे परिसर दणाणून गेला. या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. बचाव पथकांनी तत्काळ कार्यवाही करत बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं, जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवलं आणि रस्त्यावरचं झाड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पावसाळ्यातील झाडांच्या असुरक्षिततेबाबत स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली असून, अपघाताच्या कारणांवर तपास सुरू आहे.
मुंबई : दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घडलेला एक प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख ...
जीवन-मृत्यूचा प्रश्न आणि तुम्ही व्हिडीओ बनवत आहात!
बाराबंकीतील भीषण अपघातानंतर मदतीऐवजी तमाशा पाहण्याचा प्रकार समोर आला आहे. रोडवेज बसवर झाड कोसळल्यानंतर प्रवासी जीव वाचवण्यासाठी तडफडत असताना, काही जण मात्र मदतीला धावून जाण्याऐवजी मोबाईल कॅमेऱ्यात दृश्य कैद करण्यात गुंतले होते. बसच्या आत अडकलेल्या एका महिला प्रवाशाला जेव्हा कळलं की लोक फक्त व्हिडीओ बनवत आहेत, तेव्हा तिच्या भावना अनावर झाल्या. ती संतापून म्हणाली, “आमच्या आयुष्याचा, जीवन-मृत्यूचा प्रश्न आहे आणि तुम्ही व्हिडीओ बनवत आहात! जर तुम्ही येऊन झाडाची फांदी काढण्यास मदत केली असती, तर आम्ही बाहेर आलो असतो.” तिच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर जमावातील काही लोकांनी व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला तेथून दूर हटवले आणि बचावकार्याला गती दिली. या घटनेने आपत्तीच्या वेळी मानवतेपेक्षा सोशल मीडियाच्या नशेचं व्यसन किती घातक ठरू शकतं, याचा कटू अनुभव पुन्हा एकदा समोर आणला.
Big Breaking बाराबंकी के हरख क्षेत्र के राज़ाबाज़ार में चलती हुई रोडवेज पर गूलर का पेड़ गिरा, ड्राइवर सहित कई महिलाओं की मौत की ख़बर, सतरिख , जैदपुर, कोठी सहित थानों की पुलिस राहत और बचाव कार्य में लगी। #Barabanki #RoadSafety #UPSRTC #RakshaBandhan2025 pic.twitter.com/5a4EXTTarf
— Barabanki News (@BBKNews) August 8, 2025
नेमकं काय घडलं?
बाराबंकी-हैदरगड मार्गावरील हरख राजा बाजारजवळ मुसळधार पावसात शनिवारी भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली रोडवेज बस रस्त्यावरून जात असतानाच अचानक एक मोठं झाड कोसळून बसवर आदळलं. एका क्षणात परिसरात आरडाओरड सुरू झाली. जीव वाचवण्यासाठी प्रवासी घाईघाईने बसच्या खिडक्यांतून उड्या मारताना दिसले, तर काहीजण आतच अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी धावून आलं. मुसळधार पावसामुळे बचावकार्याला वेळ लागला, मात्र झाड तोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान चालकासह पाच जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये चार महिला प्रवाशांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस बाराबंकीहून हैदरगडकडे जात होती. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसात मोठ्या झाडांच्या धोक्याविषयी पुन्हा एकदा इशारा मिळाला आहे.






